'सध्या जे सुरू आहे आणि ज्या पद्धतीने सुरू आहे, ते अयोग्य - विकी कौशल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 डिसेंबर 2019

देशात सुरु असलेला हिंसाचार अत्यंत धक्कादायक 

सध्या संपूर्ण देश पेटलाय तो CAA म्हणजेच नुकताच भाजपने संसदेत पारित करवून घेतलेला आणि कायद्यात रुपांतर झालेला सुधारित नागरिकत्व कायदा  (Citizenship Amendment Act).  ईशान्येकडील राज्य असतील, पश्चिम बंगाल, दिल्ली, महाराष्ट्र सगळीकडेच याविरोधात जोरदार प्रदर्शन सुरु आहेत. जामिया इस्लामिया महाविद्यालयातील पोलिसांच्या धडक कारवाईची सर्वच स्तरातून निषेध करण्यात येतोय. 

हेही वाचा : जेवणात मटणाचे तुकडे कमी दिले म्हणून तिला जीवंत जाळलं, पुढे... 

अशातच बॉलीवूड कलाकारांकडून देखील आता प्रतिक्रिया समोर येताना पाहायला मिळतायत. यामध्ये सर्वात बोलकी प्रतिक्रिया पाहायला मिळतेय ती अभिनेता विकी कौशल याची. 'उरी' फेम विकी कौशल म्हणतोय की 

 

'सध्या जे सुरू आहे आणि ज्या पद्धतीने सुरू आहे, ते अयोग्य आहे. भारतात सर्वांना शांततेत त्याचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. देशाचा एक नागरिक म्हणून  सध्या देशात सुरु असलेला हिंसाचार अत्यंत धक्कादायक आणि काळजी वाढवणारा आहे. कोणत्याही परिस्थितीत आपल्या लोकशाहीला धक्का पोहोचेल असं व्हायला नको.   

हेही वाचा : शुद्ध हवेसाठी मध्य रेल्वे बनवणार ऑक्‍सिजन पार्लर

दिल्ल्लीतील जामिया मिलीया विद्यापीठ आणि उत्तर प्रदेशातील अलीगढ विद्यापीठात पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्जच्या विरोधात देशभरात आंदोलने सुरू झाली आहेत. याविरोधात अनेक कलाकारांनी आपला आवाज उठवायला सुरवात केलीये. 

Webtitle : What is happening is not okay The way it’s happening is not okay vicky kaushal

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What is happening is not okay The way it’s happening is not okay vicky kaushal