शिवसेनेला शह देण्यासाठी भाजप आता 'हे' करणार ?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

सेनेला काँग्रेस-एनसीपीसोबत जाऊ देण्याची भाजपची खेळी? नव्यानं निवडणुकांची भाजपची तयारी?

शिवसेनेने NDA शी काडीमोड घेतल्यानंतर भाजप-शिवसेना मिळून सरकार स्थापन होण्याची दारं जवळपास बंद झालीत. भाजपनं सरकार स्थापन करण्यास नकार दिला असला तरी मागच्या दारानं त्यांचे सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. शिवसेनेची राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेससोबत नवी समीकरणं जुळवणं सुरूय.

मात्र, या खेळीमागे भाजपच असल्याची चर्चा आहे. कारण असं सरकार स्थापन झालं तरी ते अल्पकाळाचं असेल, अशी धारणा भाजपची आहे. त्यामुळे नव्या निवडणुकांसाठी भाजपची तयारी सुरू आहे. त्या दृष्टीनं भाजपची रथयात्रेची आखणीही सुरू असल्याचं बोललं जातंय. त्याशिवाय शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार स्थापन झालं तर त्यांना घेरण्यासाठी मोठी आघाडी उघडण्याचीही भाजपची जोरदार तयारी आहे..

शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत समीकरणं जुळवता न आल्यास त्यांना पुन्हा भाजपकडे यावं लागेल, त्या दृष्टीनंही भाजपची सध्याच्या घडामोडींवर नजर आहे. इतकं करूनही जर राष्ट्रपती राजवट लागलीच तर त्या दृष्टीनं भाजपनं अगदी रथयात्रेचीही तयारी केलीय.

भाजपनं तूर्त विरोधात बसण्याची तयारी दर्शवली असली तरी त्यांच्या आगामी खेळी आणखी रंजक असतील, हे नक्की. 

Webtitle : what will be the game plan of bjp against shivsena


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: what will be the game plan of bjp against shivsena