"सभागृहात वेळेत या; व्हॉट्‌सऍप बंद ठेवा' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

मुंबई - महानगरपालिकेच्या सभागृहात वाट्टेल तेव्हा येऊन चालणार नाही. वेळेत या; पण आल्यानंतर सभागृहात बसून व्हॉट्‌सऍपवर लक्ष ठेवू नका, कामकाजाकडे लक्ष द्या, अशा शब्दांत महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी मंगळवारी (ता. 2) शिवसेनेच्या नगरसेवकांचे कान पिळले. 

भाजपचे सर्व नगरसेवक सभागृहात तसेच सर्व समित्यांच्या बैठकांना वेळेवर उपस्थित असतात; पण शिवसेनेचे नगरसेवक उपस्थित नसल्याने सत्ताधाऱ्यांची अडचण होते. त्यामुळेच महापौरांनी सर्व नगरसेवकांना फैलावर घेतले. 

वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींचे प्रशिक्षण शिबिर सुरू आहे. त्यात सर्वच वक्‍त्यांबरोबर महापौरांनी लेटलतीफ नगरसेवकांना सुनावले.

Web Title: whatsapp off