ऍपवर बोलवा ऍम्ब्युलन्स

Ambulance
Ambulance
मुंबई - ऍपबेस टॅक्‍सीप्रमाणे ऍम्ब्युलन्सदेखील ऍपवरून बोलावता यावी अशाप्रकारची व्यवस्था केली जाणार आहे. युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केलेल्या सूचनेनुसार अशाप्रकारचे ऍप तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. "आयुष्मान भारत'अंतर्गत राज्यातील 151 आरोग्यवर्धिनी केंद्रांचे लोकार्पण शिंदे व आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्या वेळी आदित्य ठाकरे यांनी सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात विविध प्रकारच्या कल्पना राबवून लोकांपर्यंत पोचण्याची आवश्‍यकता व्यक्‍त केली. ऍपबेस ऍम्ब्युलन्समुळे रुग्णाच्या घरी पोचण्याचा पत्ता शोधत बसण्याची वेळ येणार नाही, असे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com