जेंव्हा 'बॅटमॅन' महाराष्ट्र पोलिसांकडे मागतो रेफरन्स, महाराष्ट्र पोलिस म्हणतात..

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

मुंबई - मुंबई पोलिस किंवा महाराष्ट्र पोलीस ट्विटरवर कायमच ऍक्टिव्ह आहेत. आलेल्या ट्विटवर चटकन उत्तर देताना  आपण पाहिलंय आणि अनुभवलं देखील असेल. अशात महाराष्ट्रातील नागरिकांच्या दक्षतेसाठी महाराष्ट्र पोलिसांकडून विविध ट्विट केले जातात. अशाच एका ट्विट आणि त्यावरील उत्तराची आता सर्वत्र चर्चा आहे. महाराष्ट्र पोलिसांनी एक ट्विट केलं होतं, त्यावर एक हटके आणि मजेशीर कमेंट आली आणि त्याला महाराष्ट्र पोलिसांनी दिलेलं उत्तर आणखी मजेशीर आहे.

मोठी बातमी - 'हिंदुहृदयसम्राट' नाही, राज ठाकरेंना मनसैनिकांनी दिली 'ही' उपाधी

हल्ली नवनवे ट्रेंड येत असतात अशात गेल्या काही वर्षात Valentine Week चा ट्रेंड सुरु झालाय. अशात तरुणाईपर्यंत पोहोचण्यासाठी याचाच वापर पोलिसांकडून करण्यात आला. प्रपोज डे (Propose Day) चं अवचित्य साधत पोलिसांनी एक ट्विट केलं ज्यामध्ये ‘Propose Day ला आयुष्याचा भागीदार शोधा, गुन्हेगारीतला नाही’ असं ट्वीट महाराष्ट्र पोलिसांनी केलं. 

महाराष्ट्र पोलिसांच्या या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया येतायत. यावर असाच अशीच एक भन्नाट कमेंट आली त्याला महाराष्ट्र पोलिसांनी आणखी भन्नाट उत्तर दिलं. बरं ही कमेंट केली ती थेट 'बॅटमॅन' ने. बॅटमॅन अर्थात बॅटमॅन नामक युजर नेम असणाऱ्या नागरिकाने. या 'बॅटमॅन'ने थेट मुंबई पोलिसांकडे Propose Day च्या ट्वीटवर 'सर काही रेफरन्स असेल तर द्या' अशी कमेंट केली.  

मोठी बातमी -  धावत्या लोकलवर फेकली जातायत कुत्र्याची पिल्लं
 
यावर महाराष्ट्र पोलिसांनी आणखी भित्री रिप्लाय केला. "तुमचा जोडीदार तुम्हीच शोधू शकता, राव!" असा रिप्लाय महाराष्ट्र पोलिसांकडून करण्यात आला. या रिप्लायचं आता सर्वांकडून कौतुक केलं जातंय. महाराष्ट्र पोलिसांचं हे ट्विट प्रचंड व्हायरल झालंय. या ट्विटवर अजूनही अनेक भन्नाट कमेंट्स आल्यात. या वाचाल तर तुम्ही हसून हसून लोटपोट व्हाल. 

When batman asks for reference to maharashtra police on tweet

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When batman asks for reference to maharashtra police on tweet