'८ डिसेंबर 2020 ला संपूर्ण जग होणार COVID19 मुक्त; भारताची तारीख आहे २०...

सुमित बागुल
Monday, 27 April 2020

सदर बातमीतील माहिती https://ddi.sutd.edu.sg/ या वेबसाईटच्या डेटावर आधारित आहे. 

मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसचं संकट थैमान घालत आहे. आतापर्यंत जगभरात तब्बल ३० लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे जगभरात तब्बल २ लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. जगात निर्माण झालेलं हे कोरोनाचं संकट कधी टळेल हे आपल्यापैकी कोणालाही ठाऊक नाहीये. मात्र सिंगापूरच्या एका युनिव्हर्सिटीनं कोरोनाचं संकट कधी दूर होईल याची तारीख जाहीर केली आहे. गणितीय ठोकेताळे वापरून हा रिसर्च करण्यात आला आहे. दरम्यान माहिती देताना या वेबसाईटने ही माहिती केवळ अभ्यासासाठी आणि संशोधनाच्या उद्देशाने प्रकाशित केलीये. यामध्ये त्रुटीही आढळू शकतात, अशी असंही या इंग्रजी वेबसाईटने दिली आहे.  

सर्वात मोठा दावा; कोरोनावर होमियोपॅथीचे उपचार गुणकारी, गोळ्यांचं नाव आहे...

'सिंगापूर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी अँड डिझाईन' या युनिव्हर्सिटीच्या काही वैज्ञानिकांनी जगभरात अनेक देशांमध्ये असलेल्या कोरोनाच्या परिस्थितीवर अभ्यास करून या देशांमध्ये कोरोना कधी संपेल याची तारीख जाहीर केली आहे. यात त्यांनी SIR (susceptible-infected-recovered) model मार्फत अभ्यास केलाय. या आभ्यासामार्फत काही देशांच्या सध्याच्या कोरोनाच्या स्थितीचा अभ्यास केला आहे त्यानुसार त्यांनी या देशांमध्ये वाढत चाललेला कोरोनाचा संसर्ग आणि तिथल्या कोरोनाग्रस्तांच्या मृत्युचं प्रमाण यावरून कोरोनाचं संकट संपण्याचा निष्कर्ष काढला आहे. या देशांच्या दररोजच्या परिस्थतीवर अभ्यास करून या तारखांमध्ये बदल केले जात आहेत.

जगभरातून कोरोना कधी जाईल : 
या वर्षी डिसेंबर महिन्यात संपूर्ण जग १०० टक्के कोरोनमुक्त होईल अशी शक्यता या अभ्यासातून वर्तवण्यात आली आहे. मात्र कोरोना पूर्णपणे कधी संपेल यावर अजूनही अभ्यास सुरु आहे असंही या युनिव्हर्सिटीचं म्हणणं आहे. काही देशांमध्ये ९७ टक्के कोरोना कधी संपेल ती तारीख जाहीर करण्यात आली आहे.

आता तिसरा लॉक डाऊन, कारण लॉक डाऊन आता जून पर्यंत वाढणार?

भारतातून कधी जाणार कोरोना ? 

महाराष्ट्रात साधारण १९ तारखेलाच लॉक डाऊन घोषित झालेला. यानंतर भारतात २१ दिवसांचा लॉक डाऊन असेल असं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलं. अशात वाढत्या कोरोना रुग्णाची संख्या भारतासाठी डोकेदुखी ठरली. ही परिस्थिती पाहता वाढीव लॉक डाऊन जाहीर करण्यात आला. या काळातही महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून आलेत. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढतेय. अशात सर्व व्यवहार ठप्प आहे, अनेकांच्या नोकऱ्या जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुयेक सर्वांच्या मनातला एकंच प्रश्न येतोय आणि तो म्हणजे 'कधी जाणार हा कोरोना?'. या अभ्यासानुसार  २१ मे २०२० पर्यंत ९७ कट्टे कोरोना नाहीसा झालेला असेल. म्हणजेच भारत हा हिरव्या पट्ट्यात जाताना पाहायला मिळेल. तर २० मे पर्यंत ९९ टक्के कोरोना गेलेला पाहायला मिळेल. तर २० जुलै पर्यंत भारतातून १०० टक्के कोरोना गेलेला असेल असं या आभ्यासात म्हटलंय. 

उद्धव ठाकरेंना आला राज्यपालांचा फोन ; म्हणाले 'इथे भेटल्यावर ठरवू या वेळ'... 

कोणत्या देशात कधी संपणार कोरोना:

 • सिंगापूर - ४ जून २०२० (९७%)
 • अमेरिका - ११ मे २०२० (९७%)
 • टर्की - १६ मे २०२० (९७%)
 • UAE - ११ मे २०२० (९७%)
 • सौदी अरेबिया - २१ मे २०२० (९७%)
 • इटली - ७ मे २०२० (९७%) 
 • युनायटेड किंग्डम -- १५ मे २०२० (९७%) 
 • जर्मनी -- २ मे २०२० (९७%) 
 • फ्रांस -- ५ मे २०२० (९७%) 
 • स्पेन -- ३ मे २०२०(९७%) 
 • कॅनडा -- १७ मे २०२० (९७%) 
 • जपान -- १८ मे २०२० (९७%) 
 • ऑस्ट्रेलिया -- २२ मे २०२० (१००%) 
 • रशिया -- १९ मे २०२० (९७%)  
 • इराण -- १९ मे २०२० (९७%)  
 • पाकिस्तान -- ८ जून २०२०  (९७%) 

जाहीर करण्यात आलेली तारीख ही त्या त्या देशाच्या आताच्या कोरोनाच्या स्थितीनुसार देण्यात आली आहे. यात बदलही होऊ शकतात असं सिंगापूरच्या युनिव्हर्सिटीकडून सांगण्यात आलंय. सर्व देशांचा डिटेल डेटा पाहण्यासाठी इथे क्लिक करा. 

when corona will be gone from india and world read detail report


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: when corona will be gone from india and world read detail report