लोकलचा जीवघेणा प्रवास कधी थांबणार ?

kalyan
kalyan

कल्याण - मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा आणि बदलापूर ते कल्याण रेल्वे स्थानक परिसरात लोकसंख्या वाढली. मात्र लोकल फेऱ्या न वाढल्याने प्रवाश्याना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. हा जीवघेणा प्रवास कधी थांबणार असा प्रश्न केला जात आहे.

कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जत रेल्वे मार्गजवळील शहरात लोकवस्ती दिवसेंदिवस वाढत असून 10 लाखाहून अधिक प्रवासी लोकल, मेल गाडीने प्रवास करतात. मात्र लोकल फेऱ्या कमी, लोकलमध्ये जागा पकडण्यासाठी जीवाची घालमेल, रेल्वे स्थानकात फलाट आणि लोकल मधील दरी यामुळे दरवाज्यातील प्रवास करताना तोल जाऊन होणारे अपघात संख्या वाढ झाली आहे.

कल्याण पुढील शहाड, आंबिवली, टिटवाळा, खडवली, आसनगाव आणि कसारा तर पलीकडे कल्याण पुढील उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकात रेल्वे प्रशासनाने पादचारी पूल रेल्वे प्रवाश्यासाठी बांधले आहेत. मात्र त्याचा वापर करण्याऐवजी प्रवासी ट्रॅकवरुनच जाताना दिसतात. प्रवासी रेल्वे रूळ क्रॉसिंग करताना लोकल आणि मेल खाली येणे, पोलचा धक्का लागून पडणे, फलाट मधील गॅप मध्ये अडकणे, चालत्या लोकल मधून पडणे, आदी घटनेत जखमी आणि मृत्यू पावल्याची संख्या वाढली आहे.गेल्या 3 वर्षात विविध अपघात मध्ये 881 प्रवाश्यांच्या मृत्यू झाला असून 547 जखमी झाले. 

2016 मध्ये एकूण 308 जणांचा मृत्यू झाला तर 158 जखमी झाले. यात रेल्वे रूळ ओलांडून 244 जणांचा मृत्यू 46 जणांचा मृत्यू झाला. दरवाज्यात प्रवास आणि फलाट आणि लोकल मधील गॅपमध्ये पडून अश्या घटना झाल्या 62 जणांचा मृत्यू झाला तर दरवाज्यात प्रवास करताना पोलाचा धक्का लागून 2 जणांचा मृत्यू तर 3 जण जखमी झाले आहेत. 

2017 मध्ये विविध अपघात मध्ये 281 जणांचा मृत्यू तर 192 जखमी झाले आहेत. यात रेल्वे ओलांडून 229 जणांचा मृत्यू तर 47 जण जखमी झाले आहेत. 
दरवाज्यात प्रवास आणि फलाट आणि लोकल मधील गॅप मध्ये पडून अश्या घटना झाल्या यात 52 जणांचा मृत्यू तर 140 जखमी झाले आहेत. पोलाचा धक्का लागून 5 जण जखमी झाले आहेत.

2018 मध्ये विविध अपघात मध्ये 292 जणांचा मृत्यू झाला तर 191 जखमी झाले आहेत. यात रेल्वे ओलांडून प्रवास करताना 218 जणांचा मृत्यू झाला तर जखमी 37 झाले तर लोकल मधून पडून 73 जणांचा मृत्यू तर 143 जखमी झाले आहेत. पोलचा धक्का लागून 1 चा मृत्यू तर 11 जखमी झाले आहेत.

लोकल फेऱ्या कमी आणि लोकल उशिरा धावत असताना ऑफिसमध्ये लेटमार्क लागू नये म्हणून जीव धोक्यात घालून असा प्रवास करताना आपला जीव गमवावा लागला आहे. एकीकडे विमानतळामध्ये सुरक्षा असते तेथे प्रवासी विमान धावते त्या धाव पट्टीवर जातात का ? काल परवा सुरू झालेली मेट्रो येथे शिस्त असताना मध्य रेल्वे मधून प्रवास करताना का नाही ? सुविधा देत असताना शिस्तीचा बडगा का ठेवला जात नाही? असा सवाल कल्याण कसारा रेल्वे प्रवासी संघटना सचिव श्याम उबाळे यांनी केला. 

हे सुरक्षा बल केवळ मेल गाडीतील प्रवाश्याना त्रास देण्यासाठी आहे का असा सवाल केला असून याबाबत रेल्वे मंत्री पियुष गोयल याना याबाबत एका पत्रा मार्फत लक्ष्य वेधले असून लोकल फेऱ्या वाढविणे, सुरक्षा व्यवस्था वाढविणे याबाबत लक्ष्य घालावे अशी मागणी केली आहे.

याबाबत मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी डॉ. ए. के. सिंग यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की रेल्वे रूळ ओलांडून प्रवास करू नये याबाबत रेल्वे स्थानक, लोकल मध्ये घोषणा केली जाते. प्रबोधन सोबत कारवाई केली जाते. काही ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्याचे काम सुरू असून प्रवासी साठी अनेक ठिकाणी पादचारी पूल आणि सरकते जिने बांधले असून त्याचा उपयोग करण्याचे आवाहन यावेळी सिंग यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com