....कधी बांधणार पत्रिपुल

रविंद्र खरात 
शनिवार, 3 नोव्हेंबर 2018

कल्याण - कल्याण मधील जुना पत्रिपुल वाहतूकीसाठी बंद करण्यात आल्याने वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे नागरिक बेजार झाले आहेत. गणेशोत्सवानंतर जुना पत्रिपुल तोडण्याचे काम सुरू झाले मात्र आज दिवाळी आली तरी सुरू झाले नाही. यामुळे वाहतूक कोंडी होत आहे नागरिक त्रस्त झाले आहेत. पालिका, राज्यात, केंद्रात शिवसेना भाजपा युतीची सत्ता आहे. डोंबिवलीमध्ये राज्यमंत्री रविंद्र चव्हाण ठाणे मधील पालकमंत्री एकनाथ शिंदे आहेत मात्र ते आश्वासन देतात मात्र आश्वासन पूर्ण करत नाही. नागरिकाना होणारा त्रास पाहता सरकारी यंत्रणेचा लक्ष्य वेधण्यासाठी कल्याण मधील जुना पत्रिपुल जवळ मनसेच्या वतीने आंदोलन केले. 

यावेळी राज्य सरकार, रस्ते विकास महामंडळ, पालिका, रेल्वे विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलन मधील पोस्टर सर्वांचे लक्ष्य वेधून घेत होते. मनसे शहर अध्यक्ष मनोज घरत, राजेश कदम, पालिका विरोधी पक्ष नेता मंदार हळबे, गटनेते प्रकाश भोईर, माजी आमदार प्रकाश भोईर, माजी नगरसेवक उल्हास भोईर, परिवहन समिती सदस्य प्रल्हाद म्हात्रे, माजी नगरसेवक सुदेश चूडनाईक, माजी नगरसेवक अंनता गायकवाड आदींनी सहभाग घेतला.

Web Title: When will you make a patri bridge?