बाळासाहेबांना आदरांजली वाहताना फडणवीसांचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला

पूजा विचारे
Tuesday, 17 November 2020

फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या भाषणातील वक्तव्यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हि़डिओच्या माध्यमातून फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. तसंच या व्हिडिओतून त्यांनी शिवसेनेला बदललेल्या भूमिकेची आठवणही करुन दिली आहे. 

मुंबईः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज आठवा स्मृतीदिन आहे. यानिमित्तानं विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. यावेळी फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या भाषणातील वक्तव्यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हि़डिओच्या माध्यमातून फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. तसंच या व्हिडिओतून त्यांनी शिवसेनेला बदललेल्या भूमिकेची आठवणही करुन दिली आहे. 

आमचे हृदयस्थान, मार्गदर्शक, प्रेरणास्त्रोत हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनी कोटी कोटी अभिवादन, असं फडणवीस यांनी बाळासाहेबांचा फोटो ट्विट करत म्हटलं आहे. 

तर  देवेंद्र फडणवीस यांनी 'विचारांवर श्रद्धा आणि विधानांवर ठाम! : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे' असं म्हणत एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. 

 

संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन केल्यानंतर भाजपने अनेकदा शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. याबाबतच पत्रकारांनी संजय राऊत यांना विचारले असता. ते म्हटले की, 'शिवसेनेचे हिंदुत्व ज्वलंत आहे. शिवसेना हिंदुत्वाचे राजकारण करीत नाही. कोणत्याही पक्षाने आम्हाला हिंदुत्वाचे प्रमाणपत्र देण्याची गरज नाही. समाजाला गरज असेल तेव्हा शिवसेना हिंदुत्वाची तलवार घेऊन तयार असेल ' असे राऊत यावेळी म्हणाले.

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आज 8 वा स्मृतीदिनाच्या निमित्तानं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देखील स्मृतीस्थळी जाऊन बाळासाहेबांना अभिवादन केले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

अधिक वाचा-  मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना वाहिली आदरांजली

'आज बाळासाहेब आपल्यात नाही. परंतु त्यांचे विचार आपल्यासोबत आहेत. ते सतत आपल्याला प्रेरणा देत आहेत. बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्व आणि मराठी बाणा हा वारसा आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पुढे नेऊ! तसेच आजही देशाचे राजकारण बेरोजगारी आणि भूमिपुत्रांच्या मुद्यावर केंद्रीत आहे. जो मुद्दा बाळासाहेबांनी 55 वर्षापुर्वी मांडला होता. त्यांच्यामुळे प्रत्येक राज्यात हा मुद्दा आता राजकीय आणि समाजिक दृष्ट्या महत्वाचा आहे'. असेही राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

While paying tribute Balasaheb Thackeray Fadnavis indirectly attacked Shiv Sena


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: While paying tribute Balasaheb Thackeray Fadnavis indirectly attacked Shiv Sena