National Creators Awards: कोण आहेत मराठी इन्फ्लुएन्सर्स नमन देशमुख अन् मल्हार कळंबे? ज्यांना मोदींच्या हस्ते मिळाला 'क्रिएटर्स अवॉर्ड'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड' देशातील डिजिटल क्रिएटर्सना देण्यात आले.
who are marathi influencers naman deshmukh and malhar kalambe received creators award
who are marathi influencers naman deshmukh and malhar kalambe received creators award
Updated on

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड' देशातील डिजिटल क्रिएटर्सना देण्यात आले. यामध्ये दोन मराठी युट्युबर्सचा समावेश आहे. यांपैकी एक नमन देशमुख तर दुसरा मल्हार कळंबे हा आहे. हे दोघे कोण आहेत? त्यांची या पुरस्कारासाठी निवड का करण्यात आली जाणून घेऊयात. (who are marathi influencers naman deshmukh and malhar kalambe received creators award)

who are marathi influencers naman deshmukh and malhar kalambe received creators award
खासदार सुधा मूर्तींबद्दल 'या' खास गोष्टी माहितीएत का?

नमन देशमुख -

फोर्ब्स इंडियाच्या माहितीनुसार, नमन देशमुख हा एक २५ वर्षीय युट्यूबर असून @techplusgadgets हे त्याचं युट्यूब चॅनेल आहे. २०१७ मध्ये त्यानं आपला युट्यूबचा प्रवास सुरु केला. यावेळी तो आपलं कॉम्प्युटर सायन्सचं शिक्षण घेत होता. त्याच्या युट्यूब चॅनेलंच वैशिष्ट्य म्हणजे तंत्रज्ञानातील अनेक किचकट विषय तो अगदीच सोप्या शब्दांत प्रेक्षकांना समवाजावून सांगतो. (Marathi Tajya Batmya)

त्यानंतर नोव्हेंबर २०२२ मध्ये त्याला मेटा क्रिएटर ऑफ मन्थचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्यानं 'द ग्रोथ प्लस' नावाचा ऑनलाईन कोर्स सुरु केला. युट्यूबवर व्हिडिओ करु इच्छिणाऱ्यांना सोशल मीडियावर वावर वाढवण्यासाठी तो मदत करतो. त्याचबरोबर त्यानं पुढे रिलायन्स, अॅमेझॉन, शाओमी, विंडोज, सॅमसंग आणि महिंद्रा यांच्यासोबत पार्टनरशीप त्यानं केली. त्याचबरोबर सॅमसंग आणि मायक्रोसॉफ्टसोबतच्या सहकार्यानं काही व्हिडिओ केले. (Latest Maharashtra News)

who are marathi influencers naman deshmukh and malhar kalambe received creators award
Sudha Murty Nominated as MP: सुधा मूर्तींची राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती; राष्ट्रपतींनी केलं नॉमिनेटेड

क्रिएटर स्टॅटिस्टिक्स

रँक - ६२

वय - २६

लिंग- पुरुष

हँडल - @techplusgadgets

कॅटेगिरी - टेक

शहर - भोपाळ

गोट स्कोअर - ७.८३

जेन्युईटी - ८४.२७ टक्के

एन्गेजमेंट रेट - ३.५१ टक्के

अॅव्हरेज रिच - ५,८३,७९३

अॅव्हरेज व्ह्यूज- २१,१६,४९६

अॅव्हरेज एन्गेजमेंट - १,०१,९५३

who are marathi influencers naman deshmukh and malhar kalambe received creators award
National Creators Award : कोण आहेत भारताचे बेस्ट इन्फ्लुएन्सर्स? PM मोदींच्या हस्ते गौरव! पहिल्यांदाच देण्यात आले पुरस्कार

मल्हार कळंबे -

फोर्ब्सच्या माहितीनुसार, मल्हार कळंबे हा २४ वर्षीय युट्यूबर्स असून गेल्या पाच वर्षापासून तो मुंबईत समुद्र किनाऱ्याच्या स्वच्छतेचं काम करतोय. त्याच्या या कामाकडं जास्तीत जास्त लोकांचं लक्ष वेधलं जावं यासाठी त्यानं युट्यूब चॅनेल सुरु केला. व्हिडिओमधून तो पर्यावरण संरक्षण आणि प्लॅस्टिक प्रदुषण याविषयी जागरुका निर्माण करण्यासाठी तसेच प्रत्येक आठवड्याला या स्वच्छता मोहिमेसाठी स्वयंसेवक गोळा करण्याचं काम करतो. त्याच्या इन्स्टाग्राम फीडवरुन हे लक्षात येतं की तो आपल्या या कामामध्ये अधिकारी, सेलिब्रेटी आणि कॉर्पोरेट्सला कसं एकत्र आणतो. (Latest Marathi News)

who are marathi influencers naman deshmukh and malhar kalambe received creators award
Uddhav Thackeray: "महिला शक्तीनं देशातील हुकुमशहा संपवावा"; उद्धव ठाकरेंचं महिला दिनी आवाहन

क्रिएटर्स स्टॅटिस्टिक्स

रँक : 28

वय - 24

हँडल - @kalambemalhar

कॅटेगिरी - चेंज मेकर

अॅव्हरेज व्ह्यूज - 67,430.33

अॅव्हरेज एन्गेजमेंट - 6,275.05

एन्गेजमेंट रेट - 8.29

अॅव्हरेज रिच - 46,819

जेन्युईटी - 99.79

क्रिएटर इन्स्कोअर - 8.9

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com