मुंबई पोलिसांची 'दिशा' कोणी बदलली? सुशांतसिंह प्रकरणी नाईटलाईफ संस्कृतीच्या पुरस्कर्त्या नेत्यावर गंभीर टीका

तुषार सोनवणे
Thursday, 27 August 2020

भाजपनेते आशिष शेलार यांनी नाईटलाईफ संस्कृतीचे पुरस्कर्ते असलेल्या नेत्यावर पुन्हा गंभीर टीका केली आहे. हे ट्वीट नक्की कोणाकडे अंगुली निर्देश करत आहे या चर्चांना उधान आले आहे.

मुंबई - सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाला सीबीआय चौकशी सुरू झाल्यानंतर वेगळं वळण लागलं आहे. रोज या प्रकरणात नवीन मुद्दे समोर येत आहेत. मध्यंतरी या प्रकरणाशी राज्यातील मंत्रीमंडळातील युवा नेत्याशी संबध जोडण्यात येत होता. आज पुन्हा भाजपचे नेते आशीष शेलार यांनी एक ट्वीट केले आहे, ज्यामध्ये नाईटलाईफ संस्कृतीचे पुरस्कर्ते असलेल्या नेत्यावर पुन्हा गंभीर टीका करण्यात आली आहे. हे ट्वीट नक्की कोणाकडे अंगुली निर्देश करत आहे या चर्चांना उधान आले आहे.

उद्धव ठाकरेंनी बिगर भाजपशासित राज्यांचे नेतृत्व करावे: संजय राऊत

गेल्या काही दिवसांपासून सीबीआयची टीम मुंबईत विविध दिशांनी तपास करीत आहे. सुशांतच्या घराचा तपास, मित्र सिद्धांर्थ पिठाणीची चौकशी, स्वयंपाकीची चौकशी, रिया चक्रवतीची चौकशी इत्यादींबाबत तपासाचा वेग वाढला आहे. यात आता नव्याने ड्रग्स प्रकरणही पुढे आले आहे. या घटनेचा ड्रग्स माफियांशी काही संबध आहे का? यावरून गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.

कंगनाला करायची आहे नारकोटिक्स ब्युरोची मदत, म्हणाली मी सगळं सांगू शकते पण... - 

त्यामुळे ड्रग्सच्या धाग्यादोऱ्यांचा थेट संबध भाजप नेते आशिष शेलार यांनी नाईट लाईफचे पुरस्कर्ते असलेल्यांशी लावले आहे. राज्यमंत्रिमंडळातील एक युवा नेते मुंबईतील नाईटलाईफ संस्कृतीचे पुरस्कर्ते आहेत. हे सर्वांना ठाऊक आहे. शेलार यांनी यासंबधी जे ट्वीट केले आहे. त्यात म्हटले आहे की, 'नाईटलाईफ संस्कृतीचे पुरस्कर्ते तसेच "ड्रग- पब-अँड पार्टी" गँगने सुशांत सिंह रजपूतचा बळी घेतला! या "ड्रग-पब-पार्टी" टोळीचे सदस्य कोण आहेत? त्यांचे संरक्षण कोण करीत आहे? मुंबई पोलिसांच्या तपासाची दिशा कोणी बदलली? #ED #CBI सत्य समोर आणते आहे! खरे चेहरे ही समोर येतीलच!! न्याय होईल! '

भाजप नेते आशिष शेलार यांनी कोणाला संबोधून हे ट्वीट केले आहे. पोलिसांच्या तपासाची दिशा नक्की कोणी बदलली. याबाबत जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who changed the direction of Mumbai Police? Serious criticism of ashish shelar in sushantsingh rajput case

टॉपिकस