हल्लेखोर मोक्का अंतर्गत कारवाई झालेला गुंड; गवळी गँगलाही नडला होता - Sandeep Deshpande Attack | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sandeep Deshpande Attack

Sandeep Deshpande Attack : हल्लेखोर मोक्का अंतर्गत कारवाई झालेला गुंड; गवळी गँगलाही नडला होता

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी गुन्हे शाखेने दोघांना ताब्यात घेतले आहे. या आरोपींना ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हे दोघेही भांडुप पश्चिम भागातील रहिवासी आहेत. याशिवाय उर्वरित संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत. 

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी मॉर्निंग वॉक करताना क्रिकेट बॅट आणि स्टंपसह सशस्त्र मुखवटाधारी व्यक्तींनी हल्ला केला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून उर्वरित संशयितांचा शोध सुरू असून, ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी  एकाचे नाव अशोक खरात आहे. हा अशोक खरात कोण हे जाणून घेऊया...

कोण आहे अशोक खरात ?

मनसे नेता संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला अशोक खरात हा एक सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध तब्बल १३ गुन्हे नोंद आहेत. गवळी गँग मधील एकाची हत्या केल्याच्या गुन्ह्यात देखील खरात आरोपी आहे. खरात विरोधात MCOCA अंतर्गत देखील कारवाई करण्यात आली आहे. भांडुप परिसरात खरात राजकारणात सक्रिय असून दोन वेळा लोक जनशक्ती नावाच्या पार्टीकडून पलिकेलची निवडणूक त्याने लढवली आहे.


परिसरात दहशत निर्माण करून आपला दबदबा वाढवणं हा या हल्यामागचा उद्देश असल्याचं पोलीस सांगत असेल तरी त्याला राजकीय पार्श्वभूमी असण्याची देखील दाट शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार सेनेचे हे खरात उपाध्यक्ष आहेत. 

टॅग्स :Sandeep Deshpande