साई पक्ष किंगमेकर ठरणार? 

ulhasnagar-mahanagarpalika
ulhasnagar-mahanagarpalika

उल्हासनगर महापालिका निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या प्रमुख राजकीय पक्षांमध्ये मुख्य लढत होणार असली तरी साई पक्षाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. हा पक्ष आगामी निवडणुकीनंतर किंगमेकरची भूमिका बजावू शकतो, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. 

गेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजप-रिपब्लिकन पक्षाची युती झाली. मात्र, सत्तास्थापनेसाठी पक्षीय बलाबल कमी पडल्यामुळे साई पक्षाच्या सात नगरसेवकांचा पाठिंबा घेत युतीला सत्ता स्थापन करावी लागली होती. पालिकेच्या आगामी निवडणुकीच्या निकालानंतरही त्याचीच पुनरावृत्ती होऊ शकते.

गेल्या निवडणुकीत भाजपने ३३ जागा लढवून ११ जागांवर विजय मिळवला होता. त्यावेळी आम्ही कमी जागा लढवूनही सात जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे शिवसेना-भाजपच्या संभाव्य युतीने समाधानकारक जागा सोडल्या तरच युतीसोबत जाऊ, असे साई पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. या पक्षाला आपल्याकडे ओढण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचेही प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे साई पक्षाचे महत्त्व वाढले आहे.

‘बसपला यश नाही’
पालिकेत बहुजन समाज पक्षाचे दोन नगरसेवक असून दोघेही साई पक्षाच्या जवळचे असल्याचे बोलले जाते. स्थानिक पातळीवर बसपला करिष्मा फारसा दाखवता आलेला नाही. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत बसपने स्वबळाचा नारा दिला असला तरी त्या पक्षाला फारसे यश मिळणार नाही, असे जाणकारांचे मत आहे.

सिंधी मतदारांवर भवितव्य अवलंबून
साई पक्षाचे सर्वेसर्वा जीवन इदनानी यांच्यावरच निवडणुकीची सर्व धुरा आहे. सिंधी मतदारांवर पक्षाचे भवितव्य अवलंबून असेल. पक्षाकडे महापौरपद असताना केलेली कामे, तसेच प्रभागनिहाय कामे मतदारांसमोर मांडण्याचा या पक्षाचा प्रयत्न असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com