'त्या' गुप्त बैठकीचा फोटो काढणारा फोटोग्राफर कोण?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, सातवेळा आमदार राहिलेले काँग्रेसचे कालिदास कोळंबकर आणि भाजपचे  आमदार प्रसाद लाड यांच्या गुप्त बैठकीचा एक फोटो व्हायरल झाला. हा फोटो व्हायरल झाल्यानंतरच कालीदास कोळमकर आणि चित्रा वाघ या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, सातवेळा आमदार राहिलेले काँग्रेसचे कालिदास कोळंबकर आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या गुप्त बैठकीचा एक फोटो व्हायरल झाला. हा फोटो व्हायरल झाल्यानंतरच कोळमकर आणि चित्रा वाघ या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले.

परंतु, हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मिडियावर या फोटोविषयी उलट सुलट चर्चांना उधाण आलेले पाहायला मिळाले. ही एक गुप्त बैठक होती तर या बैठकीचा फोटो काढून व्हायरल करण्यात आला यावर सोशल मिडियावर दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत. या गुप्त बैठकांचे फोटो काढणारा तो फोटोग्राफर कोण याच्या चर्चा सोशल मिडीयावर रंगू लागल्या आहेत.

या फोटोविषयी माहिती घ्यायची झाल्यास हा फोटो बुधवारी मध्यरात्री मुंबईतील चंद्रकांत पाटील यांच्या घरात काढला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या घरीच ही बैठक पार पडली असल्याचेही बोलले जात आहे. त्यांनंतर आमदार कोळमकर आणि चित्रा वाघ भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या शुक्रवारी आल्या. बुधवार आणि गुरुवारीच्या मध्यरात्रीच्या बैठकीचा हा फोटो असल्याचे बोलले जात आहे. चित्रा वाघ आणि कोळमकर 30 जुलैला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत असे सांगितले गेले.

दरम्यान, भारतीय जनता पक्षामध्ये अशा प्रकारे छुप्या पद्धतीने फोटोग्राफी करण्याचा प्रकार काही पहिल्यांदा घडलेला नाही. गोपीनाथ मुंडे दिल्लीमध्ये काँग्रेसच्या काही नेत्यांना भेटल्याचे व्हिडीयो ही भाजपाच्या एका नेत्याच्या सांगण्यामुळेच लीक झाल्याचा इतिहास आहे.

बैठकांना आलेल्या इतर पक्षांच्या आमदार आणि नेत्यांची माहिती आणि फोटो लीक करण्यामागे विरोधी पक्षांवर दबाव टाकण्याचा हेतू असू शकतो किंवा या नेत्यांचं त्यांच्या त्यांच्या पक्षातील वजन कमी करण्याचा प्रयत्न असतो असे सांगण्यात येत आहे. सध्या तरी तो फोटोग्राफर कोण यावरच सगळ्यांचं लक्ष लागलेले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who is Photographer can congress ncp leaders secret photo leaked