शाब्बास इंडिया ! जागतिक आरोग्य संघटनेकडून भारताचं कौतूक...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 मार्च 2020

मुंबई - जगभरात जसा कोरोना फोफावतोय तसाच तो भारतात देखील मोठ्या प्रमाणात फोफावतोय. अशात भारतात कोरोना सध्या दुसऱ्या स्टेजमध्ये आहे. भारतात कोरोना स्टेज २ मधून स्टेज ३ मध्ये जाऊ नये म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केला जातोय. केंद्राकडून आणि राज्याकडून कोरोना प्रतिबंधासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातायत. 

दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी भारत करत असलेल्या प्रयत्नांची दखल घेत जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) भारताच्या या जबाबदारीपूर्ण वागणुकीचे कौतुक केले आहे. ‘डब्ल्यूएचओ’चे भारतातील प्रतिनिधी हेंक बेकडॅम यांनी आज भारतीय वैद्यक संशोधन परिषदेतील (आयसीएमआर) अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना बेकडॅम म्हणाले की, भारत सरकारमध्ये थेट पंतप्रधान कार्यालयाच्या पातळीपासून खालील पातळीपर्यंत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी होत असलेले जबाबदारीपूर्ण काम अत्यंत प्रशंसनीय आहे. यामुळे भारताला आत्तापर्यंत कोरोनाचा उद्रेक रोखण्यात यश आले आहे. 

#COVID19 कोणत्या वातावरणात कोरोना व्हायरस बनतो राक्षस?

#COVID19 : मास्क नक्की कसा वापरावा? १० अत्यंत महत्त्वाच्या टिप्स...

देशातील सर्व यंत्रणा यासाठी झटून काम करत असल्याचे पाहून आम्ही प्रभावित झालो आहोत. कोरोना विषाणूवर लस तयार करण्यासाठीचा पहिला टप्पा पार करताना ‘आयसीएमआर’च्या संशोधकांनी या विषाणूचा एक नमुना वेगळा करण्यात यश मिळविले असल्याबद्दलही बेकडॅम यांनी या संशोधकांचे अभिनंदन केले आहे.

WHO praises india for the measures taken to fight against covid19 corona virus

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: WHO praises india for the measures taken to fight against covid19 corona virus