दानवे यांचा वारसदार कोण?

raosaheb danve
raosaheb danve

मुंबई - केंद्रीय मंत्रिमंडळात रावसाहेब दानवे यांचा समावेश झाल्यामुळे भाजपला राज्यात प्रदेशाध्यक्षपद शोधावा लागणार आहे. दानवे यांचा वारस कोण, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून रावसाहेब दानवे यांची कारकीर्द चांगली झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपासून ते लोकसभेच्या निवडणुकांत घवघवीत यश मिळवले आहे. दानवे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदासाठी भाजपला नवा भिडू शोधावा लागणार आहे. दानवे यांच्या जागी मंत्री रणजित पाटील, आमदार सुरेश हळवणकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. 

प्रदेशाध्यक्षाप्रमाणे मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांचा कालावधी संपला आहे. त्यांनी दोन टर्म पद भूषविले आहे. त्यामुळे त्यांच्या जागी कोणाची निवड होते, याकडे भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. राज्यात पुढील काही दिवसांत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. यामुळे प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष यांची निवड करताना सर्व घटकांचा विचार केला जाईल, असे भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com