महाराष्ट्रातील हंगामी अध्यक्षपदासाठीची संभाव्य यादी

तुषार रूपनवर
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

  • विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकच ठरेल शक्तिपरीक्षा
  • हंगामी अध्यक्ष बजावणार महत्त्वाची भूमिका?
  • कोण मारेल हंगामी अध्यक्षपदावर बाजी?

महाराष्ट्रातही आता सरकार स्थापन झाल्यामुळे हंगामी अध्यक्ष निवडावा लागणाराय. बाळासाहेब थोरात आणि बबनराव पाचपुते या दोघांची नावं  सर्वात आधी पुढे आल्याचं पाहायला मिळालं होतं. अशातच आता आणखी काही  समोर येतायत. यामध्ये  राधाकृष्ण विखे पाटील, कालिदास कोळंबकर,  के सी पाडवी, दिलीप वळसे पाटील यांची नावं आहेत.  यापैकी एकाची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड राज्यपाल करतील.

राज्यातल्या सत्तासंघर्षानं टोक गाठलंय. भाजपनं सरकार स्थापन केलं असलं तरी अध्यक्षपदाच्या निवडीपासूनच भाजपची कसोटी लागणाराय. मात्र, त्या आधी प्रोटेम म्हणजेच हंगामी अध्यक्षाची निवड करावी लागणाराय.

नवी विधानसभा स्थापन झाल्यानंतर त्या सदनात सर्वाधिक काळ असणाऱ्या किंवा निवडून आलेल्या सर्वांत ज्येष्ठ सदस्याला हंगामी अध्यक्ष म्हणून निवडलं जातं. विधिमंडळ सचिवालयाकडून हे नाव राज्यपालांना पाठवलं जातं. त्यानंतर राज्यपालांकडून त्या सदस्याला शपथ दिली जाते. त्यानंतर निवडून आलेल्या 287 सदस्यांना शपथ देण्याची जबाबदारी हंगामी अध्यक्षांवर असते. हा शपथविधी संपल्यानंतर विधानसभेतील सदस्यांकडून अध्यक्षांची निवड केली जाते.

बाळासाहेब थोरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आहेत. संगमनेर मतदारसंघातून ते सलग 8 वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. ते एकदाही पराभूत झालेले नाहीत. भाजपचे बबनराव पाचपुते 1980 पासून विधानसभेवर निवडून जात आहेत. 2014 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्या वर्षी ते निवडणुकीत पराभूत  झालेत.

यामध्ये  भाजपकडून बबनराव पाचपुतेंचंच नाव पुढे रेटण्याची शक्यता वर्तवली जातेय. मात्र, हंगामी अध्यक्षाला सदस्यांना शपथ देण्याशिवाय काहीही अधिकार नसल्यानं भाजपला अध्यक्षपदाच्या निवडीच्या अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागेल, हे नक्की.

WebTitle : who will become pro tem speaker of maharashtra state assembly 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: who will become pro tem speaker of maharashtra state assembly