esakal | राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये स्वॅब टेस्टिंग लॅब का नाहीत? हायकोर्टानं राज्यसरकारकडून मागवला तपशील.. 
sakal

बोलून बातमी शोधा

swab testing

राज्यतील सर्व जिल्ह्यांमध्ये कोविड-19 तपासणी बाबत काय वैद्यकीय व्यवस्था केली आहे, जिल्ह्यांमध्ये स्वॅब टेस्ट लॅब का नाहीत, याचा तपशील दाखल करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टने आज राज्य सरकारला दिले.

राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये स्वॅब टेस्टिंग लॅब का नाहीत? हायकोर्टानं राज्यसरकारकडून मागवला तपशील.. 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यतील सर्व जिल्ह्यांमध्ये कोविड-19 तपासणी बाबत काय वैद्यकीय व्यवस्था केली आहे, जिल्ह्यांमध्ये स्वॅब टेस्ट लॅब का नाहीत, याचा तपशील दाखल करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टने आज राज्य सरकारला दिले.

मुंबई, नागपूर, पुण्यात कोरोना स्वैब टेस्टींग लॅब असताना जिल्हा पातळीवर ही अशाप्रकारे यंत्रणा असणे आवश्यक आहे, असे मत मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता आणि न्यायाधीश के. के. तातेड यांच्या खंडपीठाने व्यक्त केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यामधील मच्छीमार खालीद वास्ता यांनी केलेल्या जनहित याचिकेवर आज व्हिडीओ कौन्फरन्सिंगमध्ये सुनावणी झाली.

हेही वाचा: मोठी बातमी : राष्ट्रपती राजवटीच्या मागणीवर भाजपकडून भूमिका जाहीर  

चाकरमानी आणि स्थलांतरित मजूर यामुळे रत्नागिरीमधील कोरोनाचा धोका वाढत चालला आहे, मात्र जिल्ह्यात स्वॅब तपासणी  लॅब नाही अशी तक्रार याचिकाकर्ते वकील राकेश भटकर यांनी केली आहे. सरकारने निर्धारित केलेल्या रुग्णालयामध्ये वालावलकर मेडिकल महाविद्यालयचा समावेश आहे, 

मात्र या रुग्णालयाला अद्याप यासंदर्भात निकषांची पूर्तता करणे बाकी आहे. रायगड, सिंधुदुर्ग मध्ये ही लॅब मिरजमध्ये जाऊन तपासणी केली जाते, असे सांगण्यात आले आहे. तब्बल 1600  स्वॅबची तपासणीही करण्यास रुग्णालयाने असमर्थता दर्शवली होती, कारण दिवसांत केवळ 125 तपासणी होऊ शकतात, असा दावा याचिकेत केला आहे. 

हेही वाचा: 'ताप' वाढला! कोरोनासह तापानं ४ जणांचा मृत्यू; घाटकोपरमध्ये भीतीचं वातावरण..

न्यायालयाने याची दखल घेतली असून एकूणच सर्व जिल्ह्यातील स्वॅब तपासणीबाबत काय यंत्रणा उपलब्ध आहे याची विचारणा केली आहे. रत्नागिरीमध्ये सुमारे 44 हजार स्थलांतरित दाखल झाल्यानंतर इथे धोका वाढला आहे, असे याचिकादाराचे म्हणणे आहे. याचिकेवर पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे.

why all district in state dont have swab testing lab asked high court 

loading image