रात्री १० वाजता अमित ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना का केला फोन ?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 May 2020

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला आहे. दोन दिवसांपूर्वीच अमित ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला आहे. दोन दिवसांपूर्वीच अमित ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. या पत्रात अमित ठाकरे यांनी आपल्या काकांना कोरोनावर काही उपाय सुचवले होते. त्यानंतर आता अमित ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर संपर्क साधला आहे. पुण्यात अडकलेल्या एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. 

रात्री 10 च्या सुमारास केला फोन

सध्या पुण्यात एमपीएससी परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी अडकले आहेत. अशा विद्यार्थ्यांशी अमित ठाकरेंनी संवाद साधला. काल रात्री 10 वाजण्याच्या सुमारास अमित ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला. या संभाषणात अमित ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांसमोर पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न मांडला. 

मोठी बातमी - मंत्रालयातील प्रधान सचिवांना कोरोनाची लागण

मुख्यमंत्र्यांचं अमित ठाकरेंना आश्वासन

यावेळी अमित ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे या विद्यार्थ्यांची तात्काळ आपापल्या घरी जाण्याची व्यवस्था करण्यात यावी, बसची सोय करण्यात यावी अशी विनंती केली आहे. त्यावर या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत त्यांच्या घरी सोडण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी अमित ठाकरेंना दिलं. 

यानंतर 'एमपीएससी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य'नं ट्विट करुन अमित ठाकरेंचे आभार मानलेत. आम्ही सगळे विद्यार्थी अमित साहेबांचे आभार मानतो. आमच्या अडचणीच्या काळात अमित ठाकरे तात्काळ धावून आले, असं ट्विट एमपीएससी समन्वय समिती महाराष्ट्र राज्यनं केलं आहे.

Big News - चिंता वाढतेच आहे, 531 पोलिसांना कोरोनाची लागण...
 

 

धन्यवाद मा.अमितसाहेब ठाकरे ! आज मा.अमित राजसाहेब ठाकरे यांनी पुण्यामध्ये एमपीएससी आणि इतर स्पर्धा परिक्षांमुळे अडकलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाण्याची तात्काळ सोय करण्यात यावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांशी चर्चा केली आणि बसेसची सोय करून विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात यावे अशी विनंती केली. मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी उद्या किंवा परवापर्यंत विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. फोनवरून अमित साहेबांनी आमच्याशी फोन वरून चर्चा करून आमची विचारपूस केली, असं ट्विट देखील एमपीएससी समन्वय समिती महाराष्ट्र राज्यनं केलं आहे.

 

गंभीर ! इतरांपेक्षा लठ्ठ लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका, 'ही' आहेत कारणं...

पत्र पाठवून सुचवला होता उपाय 

दोन दिवसांपूर्वी अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं. या पत्रात अमित ठाकरे यांनी आपल्या काकांना कोरोनावर काही उपाय सुचवले. अमित ठाकरेंनी या पत्रात राज्य सरकारकडून अनेक चांगले प्रयत्न करण्यात येत असल्याचं नमूद सुद्धा केलं आहे. 

यात अमित ठाकरेंनी कोरोना रुग्णांच्या अडचणी पत्रात मांडल्या आहेत. राज्यात कोरोना व्हायरस आणि अन्य आजारांच्या उपचारासाठी जी रुग्णालयं कार्यरत आहे. त्या रुग्णालयांमध्ये बे़ड्सची क्षमता किती आहे याची स्पष्टपणे माहिती नागरिकांना नाही आहे. त्यामुळे आमच्याकडे बेड उपलब्ध नाहीत, दुसऱ्या रुग्णालयात जा असं सांगून नागरिकांना दुसऱ्या रुग्णालयात पाठवलं जात असल्याचं समोर आलं आहे. ऐन आजारात एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात पाठवलं जात असल्यानं रुग्णांची धावपळ होते. त्यामुळे यावर उपाय योजना कराव्यात असं पत्रात म्हटलं आहे.

why amit thackeray called CM uddhav thackeray at 10 pm in the night


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: why amit thackeray called CM uddhav thackeray at 10 pm in the night