जीव गेल्यावरच मदतीची घोषणा का? - रेणूका शहाणे

वृत्तसंस्था
बुधवार, 4 जुलै 2018

मुंबई : मंगळवारी (ता. 3) सकाळी अंधेरीत गोखले पुलाची मार्गिका रेल्वेस्थानकावर कोसळून पाच जण जखमी झाले. त्यानंतर पश्‍चिम रेल्वे ठप्पच झाली. अशातच रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईचे रूपांतर तलावात झाले. मध्य आणि हार्बर रेल्वे काही काळ रखडली होती. अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी पुलाच्या दुर्घटनेनंतर फेसबुकवर अनेक प्रश्न उपस्थित करत सरकारवर टीका केली आहे. 

मोठे नुकसान झाल्यावरच किंवा एखाद्याचा जीव गेल्यावरच मदतीची घोषणा का होते. असा सवाल विचारत त्यांनी राजकारण्यांसाठी ही सोपी गोष्ट झाली आहे, असे म्हटले आहे. मदतीसाठी दिला जाणारा पैसा हा करदात्यांचाच असल्याने असे करणे राजकारण्यांसाठी सोयीस्कर आहे. त्यामुळे वारंवार हेच होत असल्याचे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. 

अशा घटना घडल्यानंतर आपल्याला एक प्रश्न नेहमी पडतो की आपण या लोकप्रतिनिधिंना किंवा सरकारी कर्मचाऱ्यांना निवडून का दिले आहे...? त्यांना त्यांची कामे जमत नाहीत का..? तर उत्तर सोपे आहे.. त्यांनी कामे केली तर त्यांना पैसे खाता येणार नाहित. उदाहरणार्थ अभ्यासदौऱ्याच्या नावाखाली त्यांना परदेशवाऱ्या करता येणार नाहीत.. अशा शब्दात रेणूका शहाणे यांनी सरकारला सूनावले आहे.

मुंबईकरांच्या शांत बसण्यावरही त्यांनी टीका करताना म्हटले आहे की, सरकारी यंत्रणेच्या या कारभाराला आणखी एक गोष्ट जबाबदार आहे. ती म्हणजे मुंबईच स्पिरिट, असे म्हटले की कोणतिही घटना घडो दुसऱ्या दिवशी सगळं सुरळीत सुरु असते.

आपल्या पोस्टमध्ये उपरोधात्मक भाष्य करताना त्यांनी सरकारच्या नाकर्तेपणाला लक्ष केले आहे, आपल्या देशात तर भ्रष्टाचार अस्तित्वातच नाही.. कारण सर्व काळा पैसा पांढरा झाल्याची घोषणा सरकारने केलीच आहे.

Web Title: Why is the announcement of help only after die asked renuka shahane