महाराष्ट्राचे मालक असल्यासारखे का वागताहेत, मुख्यमंत्र्यांच्या टीकेला कंगनाचं उत्तर

पूजा विचारे
Monday, 26 October 2020

कंगनानं ट्विट करत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. तिनं आज सकाळी दोन ट्विट करत पुन्हा टीका केली आहे. 

मुंबईः शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसह अभिनेत्री कंगना राणावतलाही टाग्रेट केलं. सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी महाराष्ट्रावर, शिवसेनेवर, ठाकरे कुटुंबीयांवर जे आरोप केले ते महाराष्ट्राला बदनाम करणारं आहे. शेण खाऊन त्यांनी आमच्यावर गोमुत्राच्या गुळण्या केल्या तो सगळ्या जगाने पाहिलं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी कंगनाचं नाव न घेता तिला खडेबोल सुनावलेत. यावर कंगनानं ट्विट करत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. तिनं आज सकाळी दोन ट्विट करत पुन्हा टीका केली आहे. 

कंगनानं ट्विटमध्ये लिहिलं की, कार्यकारी मुख्यमंत्र्यांची धाडसीपणा पहा की, त्यांनी देशाचे विभाजन केले आहे, ज्यांनी त्यांना महाराष्ट्राचा ठेकेदार बनविला आहे? ते फक्त एक सार्वजनिक सेवक आहे. त्याच्या अगोदर कोणीतरी होतं, तो राज्याची सेवा करण्यासाठी लवकरच बाहेर येईल,  ते महाराष्ट्र राज्याचे मालक असल्यासारखे का वागत आहेत?

दुसऱ्या ट्विटमध्ये कंगनानं म्हटलं आहे की, हिमालयातील सौंदर्य प्रत्येक भारतीयांचेच आहे, मुंबई ज्या संधी देते त्या प्रत्येकाच्याच आहेत, दोन्ही माझी घरे आहेत, उद्धव ठाकरे तुम्ही लोकशाही हक्क हिसकावून घ्या आणि आमचे विभाजन करा, अशी तुमची हिंमत नाही, तुमचे अश्लील भाषणे अश्लिल प्रदर्शन आहेत आपल्या अक्षमतेचा...

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे 

रामानं रावणाचा वध केला. आपणही प्रातिनिधीक स्वरूपात रावणाचा वध करतो. दहा तोंडांचा रावण. अनेक तोंड आहेत. हा रावण दहा तोंडांनी महाराष्ट्रावर आलेला आहे. रावणाचं एक तोंड म्हणतंय, मुंबई पाकव्याप्त काश्मीर झालेला आहे. पाकव्याप्त काश्मीर? मला आठवत २०१४मध्ये मोदी म्हणाले होते की, पाकव्याप्त काश्मीर भारतात आणणार… पाकव्याप्त राहू द्या. भारताचा जो काश्मीर आहे तिकडे ज्यांना मुंबई पाकव्याप्त काश्मीर वाटते, त्यांना म्हणावं, अनधिकृत सोडून द्या. ३७० कलम काढलेलं आहे. अधिकृत १ इंच जमीन तरी तुम्ही आज घेऊन दाखवा आणि मग आमच्या अंगावर या. घरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईत यायचं. वरती दाखवायचं की आम्ही कष्ट केलेले आहेत. 

मुंबई महाराष्ट्राचं मीठ खायचं आणि नमकहरामी करायची, ही असली रावणी औलाद. महाराष्ट्रात जणू काही कायदा सुव्यवस्था अस्तित्वातच नाही. मुंबई पोलिस हे जणू काही निकम्मे आहेत. त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे जे काही मध्ये सगळं झालं, जणू काही महाराष्ट्रात शिवाजी पार्क असेल इकडे तिकडे गांजाची शेतीच फुललेली आहे. असं हे चित्र म्हणजे मुंबई पाकव्याप्त काश्मीर आहे. महाराष्ट्र मुंबई पोलीस निकम्मे आहेत. ते काही काम करत नाही आहेत . इकडे सगळे नशिले आहेत. असं चित्र निर्माण करायचं. त्यांना माहिती नाही आहे अजून महाराष्ट्राची संस्कृती आहे, त्या संस्कृतीत आमच्या घराघरामध्ये तुळशीची वृंदावन आहेत, गांजाची नाही.

Why are they pretending owners of Maharashtra Kangana reply Chief Minister criticism


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why are they pretending owners of Maharashtra Kangana reply Chief Minister criticism