रणवीर-रणबीरच का? तर आदित्य ठाकरेंचीही ड्रग टेस्ट करा;नीलेश राणेंची पुन्हा जहरी टीका

टीम ई सकाळ
Thursday, 3 September 2020

खासदार नीलेश राणे यांनीदेखील हा धागा पकडत पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरेंना लक्ष केले आहे

मुंबई - सुशांतसिंह राजपूत मृत्यूनंतर असंख्य चर्चांना उधान आलंय. या प्रकरणात आता अंमली पदार्थ सेवनाचाही अॅंगल आला आहे. त्यामुळे बॉलिवूडमधील ड्रग्स रॅकेटची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. अभिनेत्री कंगणा रनौत हीने बॉलिवूडमधील काही बड्या अभिनेत्यांची ड्रग टेस्ट करण्याची मागणी केली आहे. खासदार नीलेश राणे यांनीदेखील हा धागा पकडत पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरेंना लक्ष केले आहे.

सुशांतसिहच्या मृत्यूप्रनंतर बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रनौत हीने बॉलिवूडमधील घराणेशाहीवर टीका केली होती. त्यानंतर तीने मुंबईपोलिसांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आता कंगणानेही बॉलिवूडमधील  बड्या सेलिब्रेटींची ड्रग टेस्ट करावी अशी मागणी केली. त्यामुळे या चर्चेला पुन्हा नवीन वळण लागल्याचे दिसून आले. कंगणाचा हा धागा पकडत खासदार नीलेश राणे यांनी पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे यांचीही ड्रग टेस्ट करावी अशी मागणी केली आहे.

क्रॉफर्ड मार्केट दुर्घटना: नईमच्या मृत्यूमुळे कुटुंब निराधार, मृतदेह गावी नेण्यासाठीही होती पैशांची चणचण

भाजपमधील बडे नेते सरकारवर टीका करीत असतात. तसेच विशेषतः अदित्य ठाकरेंवरही टीका करण्यात येते. परंतु नीलेश राणे यांच्याकडून सातत्याने अदित्य ठाकरेंचे नाव घेऊन टीका करण्यात येत आहे. नीलेश राणेंच्या या ट्वीटला शिवसेना कसे उत्तर देते  हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

--------------------------------------------

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why Ranveer Ranbir Do drug test of Aditya Thackeray too Nilesh Rane criticism again