'तुम्हाला अटक का करण्यात येऊ नये'? सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी अर्णब गोस्वामी यांना नोटिस

तुषार सोनवणे
Wednesday, 14 October 2020

अर्णब गोस्वामी यांच्या 'पुछता है भारत' या कार्यक्रमात सामजिक तेढ निर्माण केल्याबाबत 'तुम्हाला अटक का करण्यात येऊ नये'? अशी विचारणा पोलिसांनी केली आहे.

मुंबई - रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. मुंबई पोलिसांनी त्यांच्या विरोधात चाप्टर प्रक्रिया सुरू केली आहे. अर्णब गोस्वामी यांच्या 'पुछता है भारत' या कार्यक्रमात सामजिक तेढ निर्माण केल्याबाबत 'तुम्हाला अटक का करण्यात येऊ नये'? अशी विचारणा पोलिसांनी केली आहे.

मुंबई पोलिसांनी याआधी रिपब्लिक टीव्हीने टीआऱपी घोटाळा केल्याचे सांगितले होते. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आता त्याच वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनाही पोलिसांनी नोटिस पाठवली आहे. या नोटिशीवर गोस्वामी यांना प्रक्षोभक वक्तव्य करणार नाही, असे लेखी बंधपत्र द्यावे लागणार आहे. त्यासोबतच जामिनासाठी 10 लाख रूपये भरावे लागणार आहेत. संबधित जामिनदारांवर गोस्वामी यांच्या वर्तणुकीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असणार आहे.

कारशेडसाठी कांजूरमार्गची जागा योग्य नाहीच; देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पुरावे सादर

क्रिमिनल प्रोसिजर कोड कलम 11 अन्वये सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर जांबवडेकर यांनी ही नोटस बजावली आहे. 16 ऑक्टोबर रोजी त्यांना वरळी न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. नोटिशीमध्ये ''आपण प्रसारित करीत असलेल्या कार्यक्रमांमध्ये जातीय तणाव, धार्मिक द्वेष निर्माण होईल अशी वक्तव्ये केली जातात. त्यामुळे देशाच्या एकोप्यास बाधा निर्माण होण्याची शक्यता आहे. आपण भविष्यात पुन्हा अशाच प्रकारचा गुन्हा करू शकाल, त्यामुळे आपणासंस जामिन द्यावाच लागेल. आपल्या वागणूकीचा विचार करूनच आपल्याविरूद्ध खटला दाखल करून कार्यवाही चालू करण्यात आली आहे''. असे नमुद कऱण्यात आले आहे.

मुंबईतील मेट्रो सुरु करण्यास परवानगी, ग्रंथालयं देखील उद्यापासून खुली होणार; शाळांबाबत काय म्हटलंय परिपत्रकात, वाचा

रिपब्लिक वृत्तवाहिनीचे द डिबेट आणि  आर भारत या वृत्तवाहिनीचे पूछता है भारत हे दोन्ही प्राईम टाइम शो कचाट्यात सापडले आहेत. पालघर येथील साधूंच्या हत्येनंतर हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण करणारी विधाने करण्यात आल्याचा आरोप करीत नितीन राऊत यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गोस्वामी यांना नोटिस बजावण्यात आली आहे.

ृ-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why shouldnt you be arrested Notice to Arnab Goswami for creating social rift