चारशे रेल्वेस्थानकांवर देणार वाय-फायची सुविधा

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

मुंबई - चारशे रेल्वेस्थानके 2018 पर्यंत वाय-फायने सुसज्ज करण्यात येणार आहेत. यासाठी रेल्वे, गुगल इंडिया, एमटीएनएल, बीएसएनएल आदी यंत्रणांनी सर्वंकष आराखडा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे दिले.

"वर्षा' या निवासस्थानी रेल्वेस्थानकांवर वाय-फाय सुविधा देण्याबाबतच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली, त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या वेळी माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम, सह पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती यांच्यासह रेल्वे, रेलटेल, एमटीएनएल आदी यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. रेल्वेस्थानकांवर वाय-फाय सुविधा देण्यासाठी आणि चारशे स्थानके वाय-फायने सुसज्ज करण्यासाठी अंमलबजावणी समिती स्थापन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

भारतीय रेल्वेची रेलटेल कंपनी आणि गुगल इंडिया यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार गुगल इंडिया स्थानकांवर वाय-फाय सुविधा देत आहे. सोमवारच्या बैठकीत गुगल इंडियाचे गुलझार आझाद यांनी वाय-फाय एकत्रीकरणाबाबत सादरीकरण करून माहिती दिली.

Web Title: wi-fi facility by railwaystation