दोन रुपयांपासून वाय-फाय सेवा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

मुंबई -  दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) "ओपन आर्किटेक्‍चर'वर आधारित पब्लिक वाय-फाय ग्रीडची संकल्पना मांडली आहे. हा प्रकल्प राबवल्यास इंटरनेटचा खर्च दहा पटीने कमी होऊ शकेल. खासगी कंपन्या, प्रोपरायटरशिप यांना पब्लिक वाय-फायचा प्रकल्प राबवता येईल, असे "ट्राय'ने स्पष्ट केले आहे. तसेच पब्लिक वाय-फाय ही सेवा किमान दोन रुपये किमतीपासून सुरू करा, अशी सूचना "ट्राय'ने केली आहे. 

पब्लिक वाय-फायची संकल्पना मांडण्याआधी "ट्राय'ने एक प्रायोगिक प्रकल्प राबवला होता. त्यातून काढलेल्या निष्कर्षांनुसार "ट्राय'ने सूचना केल्या आहेत. या सूचनांमध्ये वाय-फाय ग्रीडची संकल्पना प्रस्तावित करण्यात आली आहे. ग्रीडच्या संकल्पनेनुसार ऍक्‍सेस, पेमेंट, सर्व्हिस, ऑथेंटिकेशन यांसारख्या बाबी ग्राहकांना एकत्रित मिळतील. देशभरात ब्रॉडबॅंड सेवा पोचवण्याचे डिजिटल इंडियाचे उद्दिष्ट आहे. त्यामध्ये वाय-फायचा पर्याय हा सर्वांत स्वस्त आहे. या पर्यायामध्ये स्वस्त उपकरण आणि मोफत स्पेक्‍ट्रम मिळू शकेल, असे "ट्राय'ने म्हटले आहे. 

Web Title: Wi-Fi service for two rupees