18 हजार एसटीमध्ये पुढीलवर्षी वायफाय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

मुंबई - एसटीच्या ताफ्यातील 18 हजार बसमध्ये वायफाय सेवा सुरू करण्यात येणार असल्याने प्रवाशांना सर्फिंगचा आनंद घेता येईल.

वायफायच्या बाबतीत रेल्वे सुसाट आहे; पण आता एसटीही वायफायच्या दिशेने धावू लागली आहे. पुण्यातला प्रयोग यशस्वी झाल्याने वर्षभरात 18 हजार बसमध्ये वायफाय सुरू करण्याचा संकल्प एसटी महामंडळाने सोडला आहे.

वायफाय सेवा देणाऱ्या कंपनीशी महामंडळाने नुकताच पाच वर्षांचा करार केला. पुढील वर्षापासून मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर, औरंगाबाद आणि पुण्यातील काही आगारांतील बसमध्ये वायफाय बसवण्यास सुरुवात करण्यात येईल. त्यासाठी कंपनी 90 कोटी खर्च करणार आहे. कंपनीकडून एसटीला प्रतीवर्षी एक कोटी 5 लाख मिळणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

प्रवाशांना एसटीत वायफाय देण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रथम पुण्यात स्वारगेट व शिवाजीनगर आगारातील 295 बसमध्ये ही सेवा देण्यात आली. तिला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. प्रत्येक बसच्या एका फेरीत सरासरी 25 प्रवासी वायफाय वापरत असल्याचे आढळल्याने सर्व बसमध्ये ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.

Web Title: wi-fi in st