पतीचे वेतन कळण्याचा पत्नीला अधिकार - केंद्रीय माहिती आयोग

पतीचे वेतन कळण्याचा पत्नीला अधिकार - केंद्रीय माहिती आयोग

मुंबई, ता. 24 : पत्नींंना त्यांच्या पतीच्या पगाराची माहिती मिळण्याचा पूर्ण अधिकार आहे, असा महत्वपूर्ण निर्णय केंद्रीय माहिती आयोगाने दिला आहे. यामुळे घटस्फोट आणि कौटुंबिक दावे असलेल्या प्रकरणातील महिलांबरोबरच अन्य विवाहित महिलांनाही पतीचे खरे उत्पन्न कळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आयकर विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पत्नीने माहिती आयोगाकडे पतीची मिळकत कळण्यासाठी अर्ज केला होता. माहिती आयुक्त नीरजकुमार गुप्ता यांनी अंशतः हा अर्ज मंजूर केला. यानुसार पत्नीला तिच्या नवऱ्याच्या अंतिम वेतनाची माहिती द्यावी, असे आदेश आयोगाने आयकर विभागाला दिले. मात्र या वेतनाच्या फोटोकॉपी तिला देण्यास आयोगाने मनाई केली. तसेच वेतनातील वर्गीकरणही सांगण्यास मनाई केली. मात्र अंतिम वेतन सांगण्याची परवानगी दिली आहे. मुंबई उच्च न्यायालय आणि मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा दाखला यामध्ये देण्यात आला आहे.

पत्नीला तिच्या पतीच्या पगाराची माहिती कळायला हवी, पत्नी या नात्याने तिचा तो अधिकार आहे, असे न्यायालय म्हणाले. अनोळखी व्यक्तीला हा अधिकार मिळू शकत नाही, पण पोटगीच्या प्रकरणात पतीच्या वेतनाची माहिती पत्नीला मिळायला हवी, या उच्च न्यायालयाच्या निकालाचे उदाहरण आयोगाने दिले आहे.

मात्र वेतनाच्या छायांकित प्रती देता येणार नाही, कारण त्यासंबंधित व्यक्तीची खासगी माहिती आहे. त्यामुळे त्या देण्याची पत्नीची मागणी आयोगाने नामंजूर केली.

wife has right to know about his husbands salary central information committee

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com