कळव्यात प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

कळवा : कळवा महात्मा फुले नगरमधील एका 32 वर्षीय तरुणाची त्याची पत्नी व तिच्या प्रियकराने गळा दाबून खून केल्याची घटना घडली. तसेच त्याचा मृतदेह कळवा पूर्व शांतीमफतलाल झोपडपट्टीतील नाल्यात फेकून दिला होता. कळवा पोलिसांनी चार तपास पथके करून मयताची पत्नी व तिच्या प्रियकराला अवघ्या 16 तासांत ताब्यात घेऊन खुनाचा छडा लावला व आरोपीला निमच (मध्यप्रदेश) येथून ताब्यात घेतल्याची माहिती कळवा पोलिसांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

कळवा महात्मा फुले नगर झोपडपट्टीमध्ये राहणारा मयत ताजबाबू शकील अहमद सलानी (32) याची पत्नी रुबिनाबेबीचे (35) पिंटू राजपूतसोबत (28) (रा.गोकुळनगर,ठाणे) विवाहबाह्य अनैतिक संबंध होते. त्यातच रुबिनाबेबी पिंटू बरोबर एका महिन्यापासून गोकुळनगरमध्ये एकत्र राहत होते. त्यामुळे ताजबाबू व रुबिनाबेबी यांच्यात वारंवार भांडण होत होते. यातूनच पिंटू याने 8 डिसेंबरला मध्यरात्री ताजबाबूला कोणत्यातरी बहाण्याने कळवा पूर्व शांतीमफतलाल झोपडपट्टीमध्ये बोलवून घेतले व त्याचा गळा आवळून त्याची हत्या केली आणि त्यानंतर त्याचा मृतदेह येथील नाल्यात फेकून दिला. हा अनोळखी मृतदेह कळवा पोलिसांना मिळाला होता. त्यानुसार या खुनाच्या तपासाठी पोलिस आयुक्त विवेक फणसलकर, पोलिस उपायुक्त डॉ डी.एस.स्वामी, सहपोलिस आयुक्त रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कळवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांनी कळवा पोलिसांची चार पथके तयार केली होती.

तेव्हा या पथकाने राबोडी, गोकुळनगर या ठिकाणी मयताच्या पत्नीचा शोध घेतला आणि तिने प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची कबुली दिल्यावर पळून गेलेल्या आरोपी प्रल्हादसिंग उर्फ पिंटू राजपूत (28) याला त्याच्या मूळ गाव निमच (मध्यप्रदेश) येथून अवघ्या 16 तासांतच या खुनाचा छेडा लावून अटक केल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली. त्यामुळे या पोलिस पथकाचे ठाणे पोलिस आयुक्तांनी अभिनंदन केले आहे.

Web Title: Wife Murder Husband with the help of Lover in Kalva