त्याच्या पत्नीला तिकीट नाकारले!

श्रीकांत सावंत - सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

ठाणे - नितीन कंपनी चौकातील महिला पोलिसाला मारहाण करणारा माजी शाखाप्रमुख शशिकांत कालगुडे याने पालिका निवडणुकीत पत्नीला उमेदवारी मिळवण्याचे जोरात प्रयत्न केल्याची माहिती उघड झाली आहे. मारहाण प्रकरणामुळे त्याच्या पत्नीचे उमेदवारीचे स्वप्न भंगल्याची बाब पुढे आली आहे. विशेष म्हणजे या शाखाप्रमुखाशी संबंध नसल्याचा दावा शिवसेनेकडून केला असतानाही त्याच्या पत्नीने मात्र उमेदवारी अर्जात शिवसेनेकडून उमेदवारी मिळाल्याचा उल्लेख केला होता. मात्र निवडणूक आयोगाकडून हा अर्ज अपक्ष म्हणून स्वीकारल्याचे समजते.

गाडी चालवत असताना फोनवर बोलत असल्याचा जाब या महिला पोलिसाने विचारल्याने संतप्त झालेल्या या शाखाप्रमुखाने तिला मारहाण केली. या प्रकरणाची चित्रफीत सर्वत्र प्रसारित झाल्यानंतर त्याच्याशी संबंध नसल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला. या प्रकरणाचे खुलासे ट्विटर आणि फेसबुकवरूनही करण्यात आले होते. पालिका निवडणुकीदरम्यान माजी शाखाप्रमुखाच्या पत्नीने प्रभाग क्रमांक चार ब मधून अर्ज दाखल केला होता. या अर्जामध्ये त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवत असल्याचा दावा केला होता; तसेच धनुष्यबाण निवडणूक चिन्ह म्हणून मिळवल्याचेही अर्जात म्हटले होते. वास्तवात शिवसेनेने या माजी पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा अर्ज फेटाळला. त्यामुळे एबी फार्मच्या अभावी या उमेदवाराचा अर्ज अपक्ष म्हणून ग्राह्य धरण्यात आल्याचे समजते. उमेदवारी मिळवण्याचा मार्ग बंद झाल्यावर पत्नीने अर्ज मागे घेतला. याबाबतीत कोणीही अधिकृतपणे बोलण्यास तयार नाही. 

काय आहे महिला पोलिस मारहाण प्रकरण?
वाहतुकीचे नियम पायदळी तुडवणाऱ्या वाहनचालकाला रोखणाऱ्या महिला पोलिसाला मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्या राजकीय पक्षाच्या गुंडशाहीचे दर्शन या मारहाण प्रकरणातून समोर आले होते. दुसऱ्याच दिवशी त्याची जामिनावर सुटका झाली. समाज माध्यमांतल्या जनक्षोभामुळे अखेर पोलिसांनी त्याला विशेष कायद्यानुसार पुन्हा अटक केली. या मारहाणीच्या चित्रफितीमुळे समाजातील महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याची भीती महिलांनी व्यक्त केली होती. कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षितता मिळत नसल्याने शहरातील महिलांनी रोष व्यक्त केला होता.

Web Title: wife refused tickets!