दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीची हत्या 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

दारू पिण्यासाठी आई आणि पत्नीने पैसे दिले नाही म्हणून मद्यपी पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार गुरुवारी पहाटे ठाण्यात घडला. संजय रामजनम सोनी (36) असे आरोपीचे नाव असून, श्रीनगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 
 

ठाणे - दारू पिण्यासाठी आई आणि पत्नीने पैसे दिले नाही म्हणून मद्यपी पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार गुरुवारी पहाटे ठाण्यात घडला. संजय रामजनम सोनी (36) असे आरोपीचे नाव असून, श्रीनगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 

वागळे इस्टेट, साठेनगर येथे राहणाऱ्या संजना सोनी (27) हिचा संजयशी प्रेमविवाह झाला होता. काही वर्षांतच संजयला दारूचे व्यसन जडले. तो पत्नीला मारहाण करून दारूसाठी पैसे घेत असे. गुरुवारीही त्याने आधी आईकडे दारूसाठी पैसे मागितले होते; मात्र आईने नकार दिल्यानंतर पैशासाठी पत्नीकडे तगादा लावला; परंतु पत्नीनेही पैसे न दिल्याच्या रागातून संजयने संजनाची वायरने गळा आवळून हत्या केली. हा प्रकार गुरुवारी पहाटे 6.30च्या सुमारास उघड झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

Web Title: Wife's murder in sathenagar