मेहनत करा, संधी आपोआप मिळेल - किरण माने

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जानेवारी 2017

प्रभादेवी - कोणत्याही क्षेत्रात प्रगती करायची असेल, तर स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी भरपूर मेहनत केली पाहिजे. तुमच्यात गुणवत्ताच नसेल, तर संधी मिळूनही त्याचे सोने करता येणार नाही. आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचे असेल, तर प्रत्येकाने मेहनत केली पाहिजे, असा सल्ला सुप्रसिद्ध अभिनेता किरण माने यांनी विद्यार्थ्यांना दिला. 

"आपला चौथा स्तंभ - ज्ञान शक्ती मंच'च्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी (ता. 7) मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या "कलाप्रवासाचा मागोवा' या रंगतदार मुलाखतीतून अभिनेता किरण माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. चित्रपट, नाटक आणि मालिका या क्षेत्रात भूमिका करून रसिकांच्या पसंतीस उतरलेले अभिनेते किरण माने यांच्या कलाप्रवासाचा मागोवा ज्येष्ठ कला समीक्षक नंदकुमार पाटील यांनी घेतला. संस्थेतील उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या सदस्यांचा सत्कार माने यांच्या हस्ते झाला. या वेळी ज्येष्ठ नाटक समीक्षक नंदकुमार पाटील, आपला चौथा स्तंभ-ज्ञान शक्ती मंचचे अध्यक्ष विजयकुमार बांदल, ऍड. प्रीती बने, माजी सहपोलिस आयुक्त श्रीराम गवळी, भाजपचे चित्रपट कामगार आघाडीचे संजय दळवी व अजय घाटे उपस्थित होते. 

करिअर घडविण्यासाठीचा माझा प्रवास खूप खडतर होता. घरच्यांचा विरोध पत्करून मला आवडत्या क्षेत्रात येण्यासाठी मेहनत घ्यायची होती. मेहनत दोन प्रकारची असते. पहिली तुमच्या गुणवत्तेच्या निकषांवर; तर दुसरी तुम्ही केलेली मेहनत योग्य माध्यमांपर्यंत पोहचणे गरजेचे असते. 

करिअर घडविण्यासाठी ग्रामीण भागातून मुंबईला आलेले बहुतेक जण संधी मिळाल्यावर हुरळून जातात; मात्र तुमच्यात गुणवत्ताच नसेल, तर संधी मिळूनदेखील आजच्या काळात जास्त काळ टिकू शकत नाहीत.

Web Title: Will automatically get a chance to effort