राष्ट्रपती राजवट लागण्याआधी महाराष्ट्रात 'हे' होणार

राष्ट्रपती राजवट लागण्याआधी महाराष्ट्रात 'हे' होणार

मुंबई : निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या पक्षाला राज्यपाल सत्तास्थापनेसाठी निमंत्रण देतात, निवडणूकपूर्व युतीने सत्तास्थापनेचा दावा केला नसेल तर जास्त आमदारसंख्या असलेल्या पक्षाला सरकार तयार करण्यासाठी बोलावले जाईल असे प्रतिपादन ज्येष्ठ विधीज्ञ ,माजी महाधिवक्‍ता ऍड श्रीहरी अणे यांनी केले आहे.

सकाळशी बोलताना ते म्हणाले, "निवडणुकीनंतर सत्तास्थापनेचा दावा करण्यास कुणीही पुढे आले नाही तर राज्यपाल सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या पक्षाला निमंत्रण देतात. यासंबंधातील तरतुदी स्पष्ट आहेत." 

8 नोव्हेंबर रोजी सरकारचा कालावधी संपला तरीही विधीमंडळ मात्र खंडित झालेले नाही. विधानपरिषद हे तर स्थायी सभागृह आहेच, नव्या विधानसभेची प्रतिष्ठापना हा विषय भविष्यातला असला तरी विधानसभा भंग झालेली नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. सर्वाधिक जागा मिळालेल्या पक्षाने सत्तास्थापनेस नकार दिला तर राज्यपाल दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला निमंत्रण देवू शकतो काय यावर त्यांनी होकारार्थी उत्तर दिले.

नव्या विधानसभेत हंगामी अध्यक्ष जबाबदारी सांभाळत असतानाही विश्‍वासमताची प्रक्रिया पूर्ण होवू शकते असे सांगून ऍड अणे म्हणाले. हंगामी अध्यक्ष पदावर असताना विश्‍वासमत घेतले जाण्याबददलची काही उदाहरणे आहेत. यापूर्वीही असे घडले आहे. हंगामी अध्यक्षाच्या कार्यकाळात विश्‍वासमत मिळाले तरी तो पक्ष राज्य करू शकतो. एकदा विश्‍वासमताचा ठराव पारित झाल्यानंतर पुढचे सहा महिने अविश्‍वास ठराव मांडता येत नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

भाजपने सर्वाधिक जागा जिंकलेला पक्ष या न्यायाने शिवसेना सहभागी झाली नाही तरी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलीच तर विधानसभाअध्यक्षाच्या निवडीच्या प्रसंगी या पक्षाची कसोटी लागेल असे मानले जाते. भाजपने पुढे केलेल्या विधानसभाअध्यक्षाच्या उमेदवाराला सर्वाधिक मते मिळाली नाहीत तर तो त्या सरकारचा पराभव मानला जातो. मात्र हंगामी अध्यक्षाच्या उपस्थितीत विश्‍वासमत मिळवता येते ही नवी माहिती समोर आली आहे. 

कोण आहेत श्रीहरी अणे ?  

स्वतंत्र विदर्भवादी चळवळीतले कट्टर नेते म्हणून श्रीहरी अणे यांची ओळख आहे. श्रीहरी अणे हे महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता आहेत. ते विधिज्ञ आणि अ‍ॅडव्होकेट आहेत. ऑक्टोबर 2015 मध्ये श्रीहरी अणे यांची महाराष्ट्राच्या महाधिवक्ता पदी नियुक्ती झाली होती. 

श्रीहरी अणे हे लोकनायक बापूजी अणे यांचे नातू आहेत.  श्रीहरी अणे यांचा जन्म पुण्यात झालाय. श्रीहरी अणे यांनी नागपुरातल्या गांधीनगरातील एका मोटारीच्या गॅरेजमध्ये राहून त्यांनी वकिली सुरू केली. स्वतंत्र विदर्भ राज्याची चळवळ सुरू करण्यात लोकनायक अणे यांचा सिंहाचा वाटा होता. याच वाटेवर चालत श्रीहरी अणे देखील कट्टर विदर्भवादी आहेत. 

Webtitle : this will happen before implementing of presidential rule in maharashtra

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com