संजय केळकरांच्या विजयी रॅलीत सहभागी होणार

ठाणे ः संजय केळकर यांच्या प्रचारार्थ कॉफी विथ पियूष या कार्यक्रमात बोलताना रेल्वे मंत्री पियुष गोयल.
ठाणे ः संजय केळकर यांच्या प्रचारार्थ कॉफी विथ पियूष या कार्यक्रमात बोलताना रेल्वे मंत्री पियुष गोयल.

ठाणे : केंद्र तसेच राज्य सरकार जसे इमानदारीने आणि पारदर्शक पद्धतीने काम करीत आहे, त्याप्रमाणेच ठाणे शहर विधानसभा निवडणुकीत आपल्या कामाशी इमानदार असलेले महायुतीचे संजय केळकर एक लाख मताधिक्‍याने निवडून येणार आहेत. त्यांच्या विजयी रॅलीत सहभागी होण्यासाठी मी नक्की येईल, असा विश्‍वास रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी व्यक्त केला.

केळकर यांच्या प्रचारार्थ कॉफी विथ पियूष या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भाजपचे माजी उपाध्यक्ष किरीट सोमय्या, खासदार राजन विचारे, विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

ठाण्याचे व माझे नाते फार जुने!
भाजप सरकारच्या माध्यमातून देश प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. उद्योग आणि बांधकाम क्षेत्रात ठाणे अग्रेसर शहर म्हणून ओळखले जात आहे. माझे आणि ठाण्याचे नाते फार जुने असून ठाणे सुसंस्कृत लोकांचे शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे ठाण्याचा आमदारदेखील सुसंस्कृत, सुशिक्षित आणि व्यावसायिक, उद्योजकांना त्रास न देणारा इमानदार आमदार आपल्याला लाभणार असल्याचे गोयल म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com