esakal | रविवार पासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार
sakal

बोलून बातमी शोधा

Rain

रविवार पासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : सांताक्रुझ (Santacruz) येथे आज सकाळी 8 वाजे पर्यंत 24 तासातील विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. सांताक्रुझ (Santacruz) येथे आज 253.3 मि.मी पावसाची नोंद झाली असून, यापुर्वी 2 जुलै 2019 ला दशकातील सर्वाधिक 376.2 मि.मी पावसाची नोंद झाली होती. तर, रविवार पासून पुन्हा मुंबईसह (Mumbai) महामुंबईतील पावसाचा जोर वाढणार असून मंगळवार पर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही भागात 200 मि.मी पावसाचा अंदाज आहे. या काळात समुद्रात वाऱ्यांचा वेगही जास्त राहाणार आहे. (will rain again from Sunday ass97)

सिंधुदूर्ग (Sindhudurg) पासून रायगड (Raigad) पर्यंतच्या जिल्हात मंगळवार पर्यंत पावसाचा जोर कायम राहाणार असून, या भागात मंगळवार पर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पहाटे मुंबईत पावसाने चांगलाच जोर धरला होता. गुरुवार सकाळी 8 ते शुक्रवारी सकाळी 8 वाजे पर्यंत सांताक्रुझ येथे 253.3 मि.मी पावसाची नोंद झाली. तर,कुलाबा येथे 12.8 मि.मी पाऊस नोंदविण्यात आला आहे. गेल्या दहा वर्षात जुलै महिन्यातील सर्वाधिक पाऊस 2 जुलै 2019 मध्ये 376.2 मि.मी नोंदविण्यात आला होता.

हेही वाचा: रविवारी 'या' रेल्वे मार्गांवर मेगाब्लाॅक, जाणून घ्या सविस्तर

कोकण किनारपट्टीवर पावसाळी ढगांची दाटी झाली असल्याने पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे रविवार पासून मंगळवार पर्यंत मुंबईसह महामुंबईत खुप जोरदार पाऊस होण्याची शक्‍यता असून, हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या काळात काही भागात 204 मि.मी पावसाचा अंदाज आहे. तर,ही परिस्थिती उर्वरीत कोकणात उद्या पासून कायम राहाणार आहे.

हेही वाचा: NCB: बड्या राजकीय नेत्याच्या निकटवर्तीयाची ड्रग्स प्रकरणी चौकशी

रात्री 8 वाजे पर्यंत 24 तासांत झालेला पाऊस

  • कुलाबा - 11.5 मि.मी

  • सांताक्रुझ 113.8 मि.मी

loading image