ठाण्यातील गटई कामगारांच्या समस्या सोडविणार- बच्चू कडू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

ठाण्यातील गटई कामगारांच्या समस्या सोडविणार- बच्चू कडू

ठाणे : ठाणे शहरातील गटई कामगारांच्या समस्या सोडविण्याबाबत आपले महापालिका आयुक्तांशी बोलणे झालेले आहे. या संदर्भात आगामी महिनाभरात बैठक लावून हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन सामाजिक न्याय राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले.

ठाण्यात एका कार्यक्रमासाठी बच्चू कडू आले होते. या वेळी गटई चर्मकार कामगार संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गटई कामगार, आदिवासी, तुर्फेपाडा येथील झोपडपट्टीवासीयांनी राज्यमंत्री कडू यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना बच्चू कडू यांनी हे आश्वासन दिले. संजीव जयस्वाल पालिका आयुक्त असताना ठाण्यातील दिव्यांगांच्या स्टॉलचा आणि घरांचा प्रश्न आम्ही मार्गी लावला होता.

हेही वाचा: राज्यात जवळपास 80 टक्के लसीकरण;पाहा व्हिडिओ

२५ ते ३० टक्के दिव्यांगांना घर, स्टॉलचे वाटप करण्यात आलेले आहे. त्याच धर्तीवर चर्मकारांच्या समस्यांबाबत आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याशी चर्चा झालेली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून चर्मकारांचे स्टॉल, पीच परवाना आणि इतर समस्यांवर मार्ग काढण्यात येईल, असे ते म्हणाले.

loading image
go to top