esakal | राज्यातील सर्व कोचिंग क्लास सुरु करणार; कारवाई झाल्यास जेल भरो आंदोलनाचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यातील सर्व कोचिंग क्लास सुरु करणार; कारवाई झाल्यास जेल भरो आंदोलनाचा इशारा

गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून राज्यातील सर्व कोचिंग क्लासेस बंद असल्याने क्लास संचालकांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे

राज्यातील सर्व कोचिंग क्लास सुरु करणार; कारवाई झाल्यास जेल भरो आंदोलनाचा इशारा

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

ठाणे - गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून राज्यातील सर्व कोचिंग क्लासेस बंद असल्याने क्लास संचालकांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. येत्या 23 नोव्हेंबरपासून 9 वी ते 12 वी चे वर्ग सुरु करीत शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर 25 नोव्हेंबरपासून राज्यातील सर्व कोचिंग क्लासेसही सुरु होतील असा ठराव कोचिंग क्लासेस संचालक महाराष्ट्र संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने बुधवारी मंजुर करण्यात आला. क्लास सुरु झाल्यानंतर क्लासवर प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई केल्यास राज्यभर जेल भरो आंदोलन करण्याचा इशारा यावेळी संघटनेच्यावतीने देण्यात आला. 

हेही वाचा - यंदा फटाक्यांवर संक्रांत, मश्जिद बंदरमधली फटाक्यांची दुकाने रिकामीच

लॉकडाऊन काळात क्लासेस बंद असल्याने क्लास संचालकांना मोठ्या आर्थिक प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. देशभरासह राज्यात अनलॉकचा टप्पा सुरु झाला आहे. शैक्षणिक संस्था वगळता इतर गोष्टी सुरु झाल्या आहेत, परंतू शैक्षणिक क्षेत्राबद्दल शासनाकडे कोणतीही नीती नियमावली व आराखडा नाही. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 23 नोव्हेंबरपासून 9 वी ते 12 वी चे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा सुरु झाल्यानंतर 25 नोव्हेंबरपासून राज्यातील कोचिंग क्लासेस सुरु करण्यात येणार आहेत. क्लास सुरु केल्यानंतर प्रशासनाने क्लास बंद करण्याची सूचना, दंड आकारणी किंवा कायदेशीर कारवाई केल्यास राज्यभर जेल भरो आंदोलन करु असे संघटनेचे सचिव सचिन सरोदे यांनी सांगितले.

हेही वाचा - मृतक एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाखांची मदत; एसटी कामगार सेनेची कुटुंबियांना भावनिक साद

क्लास संचालकांचाही विचार प्रशासनाने करावयास हवा, शाळा, शिक्षक, क्लास संचालक, विद्यार्थी यांच्याविषयी कोणताही ठोस कृती आराखडा अद्याप तयार झालेला नाही, शिक्षणाविषयी एवढी उदासिनता का असा सवालही त्यांनी यावेळी केला.

Will start all coaching classes in the state Warning to fill the jail if action is taken

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top