वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा परवाना निलंबित करणार : ससाणे

रविंद्र खरात
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

कल्याण : वाहनचालकांचे प्रबोधन करूनही कल्याण डोंबिवली शहरात अनेक वाहनचालक नियमांचे पालन करत नसल्याने त्यांच्याविरोधात आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्त मोहीम उघडली असून, दोषी वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यात येणार आहे. तसेच त्यांचे लायसन्स निलंबित करण्यात येणार असून त्या वाहनचालकाला आरटीओमार्फत दोन तासांच्या रस्ते सुरक्षा विषयक नियमाच्या समुपदेशन कार्यशाळेत उपस्थित राहावे लागणार असल्याची माहिती कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी 'सकाळ'ला दिली.

कल्याण : वाहनचालकांचे प्रबोधन करूनही कल्याण डोंबिवली शहरात अनेक वाहनचालक नियमांचे पालन करत नसल्याने त्यांच्याविरोधात आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्त मोहीम उघडली असून, दोषी वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यात येणार आहे. तसेच त्यांचे लायसन्स निलंबित करण्यात येणार असून त्या वाहनचालकाला आरटीओमार्फत दोन तासांच्या रस्ते सुरक्षा विषयक नियमाच्या समुपदेशन कार्यशाळेत उपस्थित राहावे लागणार असल्याची माहिती कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी 'सकाळ'ला दिली.

देशपातळीवर रस्त्यावरील अपघात पाहता सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त करत रस्ता सुरक्षा समिती स्थापन केली होती राज्य , जिल्हा आणि तालुका पातळीवर कठोर कारवाईबाबत आदेश देण्यात आले होते .याच पार्श्वभूमीवर आज गुरुवार ता 13 डिसेंबर रोजी राज्याचे परिवहन विभाग अप्पर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह आणि परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी व्हिडीओ क्रोफ्रँरन्सद्वारे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी , आरटीओ अधिकारी , बांधकाम विभाग , पोलिस आणि वाहतूक पोलिस अधिकाऱ्यासोबत बैठक घेऊन कारवाईची माहिती घेतली . 

दरम्यान कल्याण आरटीओ आणि वाहतूक पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण डोंबिवली शहरात बेशिस्त वाहन चालकाविरोधात 1 डिसेंबर ते 12 डिसेंबर या कालावधीत हेल्मेट न घालणाऱ्या 46 दुचाकीवर कारवाई करण्यात आली , 3 सीट बेल्ट न लावणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली . मोबाईलवर संभाषण करत वाहन चालविणाऱ्या 6 जणांवर कारवाई करण्यात आली. कर्कश हॉर्न वाजविणे वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. माल वाहतूक करणाऱ्या वाहनात क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेणाऱ्या 4 वाहनावर कारवाई करण्यात आली . फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या 4 जणांवर कारवाई करण्यात आली. तर 12 आणि आज गुरुवार ता 12 डिसेंबर विशेष पथकामार्फत वाहनाची तपासणी करण्यात आली.

यामध्ये हेल्मेट न घालणाऱ्या 31 दुचाकीचालकांवर कारवाई करण्यात आली . सीट बेल्ट न लावणाऱ्या 10 कारचालकांवर कारवाई करण्यात आली. मोबाईलवर संभाषण करणाऱ्या 12 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. कर्कश हॉर्न वाजविणाऱ्या एका वाहनचालकावर कारवाई करण्यात आली. तर नियमबाह्य फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या 6 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली .

दोषी वाहनचालकांवर काय होणार कारवाई 

लायसन्स निलंबन होणार ...

1) विहित मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे यात दोषी आढळल्यास 90 दिवस वाहनचालकांचे लायसन्स निलंबित होणार . 

2 ) सिग्नल तोडल्यास.. 90 दिवस वाहन चालकांचे लायसन्स निलंबित होणार . 

3 ) मालवाहू वाहनात मर्यादा पेक्षा जास्त वाहतूक केल्यास 90 दिवस वाहन चालकांचे लायसन्स निलंबित होणार . 

4 ) माल वाहनातून प्रवासी वाहतूक करणे 90 दिवस वाहन चालकांचे लायसन्स निलंबित होणार . 

5 ) दारू किंवा अंमली पदार्थ सेवन करून गाडी चालविल्यास 180 दिवस वाहन चालकांचे लायसन्स निलंबित होणार . 

6 ) वाहन चालविताना मोबाईल वापरल्यास 90 दिवस वाहन चालकांचे लायसन्स निलंबित होणार.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार उपाययोजना आणि कारवाई करून ही बेशिस्त वाहन चालक सुधारत नसल्याने एक डिसेंबरपासून बेशिस्त वाहनचालका विरोधात दंड वसूल होणार आहे. त्यासोबत लायसन्स निलंबित होणार असून, संबंधित वाहनचालकांना 2 तास समुपदेशन रस्ता सुरक्षा विषयक देण्यात येणार असल्याची माहिती कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी दिली .

Web Title: will suspend of Licence says traffic police officer Sanjay Sasane