दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार : मुनगंटीवार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

उद्यानात मद्यपान व मांसाहार करण्यास मनाई आहे. या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी पश्‍चिम वन विभागाचे (वन्यजीव) अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. के. राव यांना दिले आहेत. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. 

मुंबई : बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (नॅशनल पार्क) ओली पार्टी करणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी दिले. "सकाळ'ने ही बाब उघडकीस आणली होती. 

नॅशनल पार्कमधील तुळशी तलावाजवळील "लॉगहट' या वन विभागाच्या अतिथिगृहात 12 मार्चला झालेल्या या पार्टीत वन विभागाचे आजी-माजी अधिकारी सहभागी झाले होते. त्यात मुख्य वनसंरक्षक व संचालक अन्वर अहमद यांचाही समावेश होता. या पार्टीचे फोटो फेसबुकवर अपलोडही करण्यात आले होते. "सकाळ'मध्ये याबाबत प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेत वनमंत्र्यांनी संबंधितांवर कारवाईचे आश्‍वासन दिले. 

ते म्हणाले, उद्यानात मद्यपान व मांसाहार करण्यास मनाई आहे. या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी पश्‍चिम वन विभागाचे (वन्यजीव) अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. के. राव यांना दिले आहेत. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. 

Web Title: will take Action on the guilty officers