नाताळ व नववर्षानिमित्त मद्यविक्रीच्या वेळेत सूट

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

मुंबई - नाताळ व नववर्षानिमित्त 24, 25 व 31 डिसेंबर रोजी राज्यातील विविध मद्य विक्री परवानाधारक दुकाने निर्धारित वेळेनंतर रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. विदेशी मद्य किरकोळ विक्रीचे दुकान (एफ एल -2) रात्री 10.30 ते मध्यरत्री 1 पर्यंत, ई परवाना असलेले बिअरबार पहाटे 5 वाजेपर्यंत खुले राहतील. राष्ट्रीय राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्री परवाना बंद करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे पालन करत राज्य उत्पादन शुल्क विभागाने नवीन मद्य विक्री परवाना मंजूर करण्याबाबत निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: wine sailing christmas & new year time increase