ठाणेकरांना गुलाबी थंडीची चाहूल 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 डिसेंबर 2019

अवकाळी पावसानंतर ऐन डिसेंबर महिन्यात "हिवाळी सरीं'ची रिमझिम बरसात नुकताच ठाणेकरांनी अनुभवली. त्यानंतर, हवामान कोरडे झाल्याने तसेच, उत्तरेकडून वाहत असलेल्या जोरदार थंड वाऱ्यामुळे रविवारी मुंबई-ठाण्यात गुलाबी थंडीची चाहूल लागली. त्यामुळे, नेहमीच्या उकाड्याच्या रहाटगाडग्यात सध्या ठाणेकर थंड हवेच्या ठिकाणांची अनुभूती घेत आहेत. 

ठाणे : अवकाळी पावसानंतर ऐन डिसेंबर महिन्यात "हिवाळी सरीं'ची रिमझिम बरसात नुकताच ठाणेकरांनी अनुभवली. त्यानंतर, हवामान कोरडे झाल्याने तसेच, उत्तरेकडून वाहत असलेल्या जोरदार थंड वाऱ्यामुळे रविवारी मुंबई-ठाण्यात गुलाबी थंडीची चाहूल लागली. त्यामुळे, नेहमीच्या उकाड्याच्या रहाटगाडग्यात सध्या ठाणेकर थंड हवेच्या ठिकाणांची अनुभूती घेत आहेत. 

निसर्गरम्य येऊर-उपवनसारख्या ठिकाणी तर, अभूतपूर्व गारवा जाणवत असल्याच्या प्रतिक्रिया मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांनी व्यक्त केल्या. ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार रविवारी ठाण्याचा पारा किमान 24.01 आणि कमाल 33 अंश सेल्सिअस इतका असल्याची माहिती देण्यात आली. 

तलावांचे शहर अशी ख्याती असलेल्या ठाणे शहरात नैसर्गिक संपदा देखील विपुल प्रमाणात आहे. निसर्गरम्य परिसर असलेला येऊर आणि उपवन तलाव परिसरातील दाट वनराईमुळे तापमानाचा पारा घसरत असून गारवा जाणवू लागला आहे. तथापि, यंदा निसर्गाचे सगळेच गणित बिघडून गेल्याचे दिसून येत आहे. 

अवकाळी पावसानंतर नुकतीच हिवाळी रिमझिम ठाणेकरांना अनुभवता आली. त्यानंतर रविवारची पहाट ठाणेकरांसाठी गुलाबी थंडीची चाहूल देऊन गेली. सकाळपासूनच ठाण्यात गार वारे सुटल्याने दिवसभर हवेत गारवा जाणवत होता. 

हवामान तक्ता (अंश सेल्सियसमध्ये) 
                किमान     कमाल 
5 डिसेंबर    26.01    32.05 
6 डिसेंबर    26.04    33.02 
7 डिसेंबर    24.04    33.04 
8 डिसेंबर    24.01    33.00 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Winter season starts in Thane