esakal | मिरा-भाईंदरमध्ये मिडी बस
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मिरा-भाईंदरमध्ये मिडी बस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मिरा-भाईंदर : महापलिकेच्या (municipal) परिवहन सेवेत महाप सध्या ५९ मोठ्या बस (Bus), पाच वातानुकूलित वोल्व्हो (Volvo Bus) बस आणि १० मिडी बस (Midi bus) आहेत. या बस शहरातील (City) मुख्य रस्त्यांवरच धावताना दिसत आहेत. शहरातील अंतर्गत भागात अजूनही बससेवा पोहोचू शकलेली नाही. शिवाय शहरातील अरुंद रस्त्यांवर मोठ्या बस धावत असल्याने वाहतूक कोंडीदेखील होत असते.

महापालिकेने आणखी ३० मिडी बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या मिडी बस फक्त मिरा-भाईंदर शहरातच धावणार आहेत. शिवाय येत्या दोन ते तीन वर्षांत शहरात मेट्रोदेखील धावायला लागणार आहे. त्यामुळे मेट्रो स्थानकापासून ते शहरातील इतर भागापर्यंत या बस अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. शिवाय रिंग रूट सेवाही सुरू करता येणार आहे.

मिडी बस आल्यामुळे मोठ्या बस शहराबाहेरील लांब पल्ल्याच्या मार्गावर धावू शकतील. सध्या महापालिकेची सेवा ठाणे, बोरिवली आणि अंधेरीपर्यंतच आहे; मात्र नवी मुंबईतील वाशी, वसई-विरार, मुलुंड, भिवंडी या मार्गावरही बस सुरू करण्याची प्रवाशांची मागणी आहे. हे मार्ग सुरू करण्याचा प्रयत्न आहे. तोटा कमी करण्याच्या उपाययोजना आखल्या जात आहेत.

- दिलीप जैन, सभापती. परिवहन समिती

हेही वाचा: रिक्षा-ट्रक-ट्रॅक्टरचा विचित्र अपघात, पाच जणांचा मृत्यु

पाच बस महिलांसाठी ?

बस खरेदीसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ११.५० कोटी

रुपयांची तरतूद करण्यात आली. ३० मिडी बस खरेदीसाठी त्यातून १० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या खर्चाला महासभेने नुकतीच मान्यता दिली आहे. या बस ३१ आसनी आहेत. मिडी बसपैकी पाच बस महिलांसाठी राखून ठेवण्याची मागणी भाजपच्या नगरसेविका वर्षा भानुशाली यांनी केली आहे, त्यावरही लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.

loading image
go to top