ग्रामिण भागात पैसै काढण्यासाठी 'पे नियरबाय' दालनं सज्ज...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 April 2020

आता बँक मित्र आणि आधार कार्ड अनेबल्ड पेमेंट्सच्या मदतीने ग्राहकांना केवळ त्यांच्या अंगठ्याचा ठसा वापरून रोज 10 हजार रुपये काढता येणार आहेत.

मुंबई :कोरोनामुळे देशभरात लागू झालेल्या लॉकडाउनमुळे समाजातील सर्वात गरीब स्तराला, विशेषतः स्थलांतरित कामगार आणि ग्रामीण लोकसंख्येला सर्वात मोठा फटका बसला आहे. मात्र, आता बँक मित्र आणि आधार कार्ड अनेबल्ड पेमेंट्सच्या मदतीने ग्राहकांना केवळ त्यांच्या अंगठ्याचा ठसा वापरून रोज 10 हजार रुपये काढता येणार आहेत. ग्रामीण भागात ही सुविधा वरदान ठरणार आहे. पेनियरबायने आपल्या 8 लाख बँकिंग प्रतिनिधींच्या नेटवर्कद्वारे रोख पैस काढण्याची व भरण्याची प्रक्रिया अतिशय सुलभ केली असून त्यामुळे दररोज 8.5 लाख व्यवहार होतात. 

VIDEO : सनी लिओनीची आयडीयाची कल्पाना, 30 सेकंदमध्ये मास्क बनवण्याचे देतेय प्रशिक्षण

केवळ पाच टक्के ग्रामीण भारताला म्हणजेच 6.5 लाख गावांपैकी केवळ 30 हजारांसाठी एटीएम सेवा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी सरकारने 115 दशलक्ष डेबिट कार्ड्स अवैध ठरवली होती, कारण त्यात योग्य चिप आणि पिन मँडेट नव्हते. कोरोनामुळे लादल्या गेलेल्या लॉकडाउनदरम्यान या अवैध कार्डांच्या मालकांपुढे अडचण निर्माण झाली आहे, कारण ही कार्ड्स त्यांना वापरता येत नाहीत. अशा परिस्थितीत पेनियरबायने लोकांना आपल्या बीसी नेटवर्कद्वारे आर्थिक सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. 

केंद्र सरकार एक एप्रिलपासून 80 कोटी गरीब भारतीयांना 1.75 लाख कोटी रुपये देण्याचे जाहीर केले असून या रिलीफ पॅकेजचा लाभ योग्य लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये सुविधांशी संबंधित बरेच अडथळे आहेत. शिवाय, ग्रामीण लोकसंख्येत जागरूकता नसल्यामुळे 1.25 लाख कोटी डीबीटी काढला न गेल्यामुळे बँक खात्यांमध्ये तसाच पडून आहे. अशा परिस्थितीत बँकिंग प्रतिनिधी रोख पैसे काढण्यासाठी सेवा उपलब्ध करून देत असून, दररोज 125 कोटी मूल्याचे व्यवहार केले जात आहेत.

मोठी बातमी - कोरोनाच्या लढ्यात उद्धव-राज 'साथ-साथ" 

स्वच्छता, सॅनिटायझेशन आणि सामाजिक अंतर राखत असून 1 लाख डिजिटल  व्यवहार करत आहेत. राष्ट्रसेवेच्या या हाकेला आम्ही पूर्ण प्रतिसाद देऊ शकत आहोत याचा खूप आनंद वाटतो,’ असे पेनियरबायचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद कुमार बजाज यांनी म्हटलं आहे.

to withdraw money in rural areas of maharashtra pay nearby is ready to serve


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: to withdraw money in rural areas of maharashtra pay nearby is ready to serve