पाणीपुरवठा समितीच्या अध्यक्ष, सचिवाची खोटी सही करून 61 हजार काढले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

खर्डी - खर्डी-कसाराजवळील वेळुक या गावातील एका ग्रामस्थाने पाणीपुरवठा अध्यक्ष व सचिव यांच्या खोट्या सह्या करून 61 हजार रुपये (बेरर) काढले असल्याचा आरोप कॉंग्रेसचे शहापूर तालुका उपाध्यक्ष योगेश भोईर यांनी लेखी निवेदनाद्वारे केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून सरकारची फसवणूक करणाऱ्या गुरुनाथ परशुराम भोईर (रा. वेळुक) व त्याला सहकार्य करणाऱ्या बॅंकेच्या कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी कसाऱ्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप कसबे यांच्याकडे केली आहे.

वेळुक या गावासाठी 2008 साली पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात येऊन कार्यान्वित करण्यात आली होती; परंतु ती योजना चार वर्षांपासून तांत्रिक अडचणीमुळे बंद आहे. या योजनेचे 61 हजार रुपये कसारा येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र या शाखेत जमा होते. वेळुक येथील गुरुनाथ परशुराम भोईर याने येथील पाणीपुरवठा अध्यक्ष भरत भोईर व सचिव किशोर भोईर यांच्या खोट्या सह्याकरून 3 फेब्रुवारी 2016 रोजी 20 हजार रुपये, 8 जुलै 2016 रोजी 25 हजार रुपये, 19 ऑक्‍टोबर 2016 रोजी 11 हजार रुपये आणि 20 जानेवारी 2017 रोजी 5 हजार रुपये येथील बॅंकेच्या कर्मचाऱ्याच्या सहकार्याने काढले असल्याचा आरोप भोईर यांनी केला आहे. याप्रकरणी अध्यक्ष भरत भोईर व सचिव किशोर भोईर यांनी बॅंकेला सदर धनादेशावर आमच्या सह्या नसल्याचे लेखी पत्र दिले आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे कसाऱ्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी सांगितले.

Web Title: Withdrawl of money using bogus signature