भुजबळांशिवाय अाेबीसी परिषद बेरंग!

दिनेश चिलप मराठे
शनिवार, 12 मे 2018

मुंबई : अाेबीसींची जातगणना करण्याकरीता सरकार का घाबरत अाहे? जर जातगणना झाली तर अाेबीसींना त्यांची खरी ताकद कळून येर्इल हेच त्या मागचे खरे कारण आहे. ओबीसींना त्यांची संख्या कळली तर सत्तेच्या चाव्या त्यांच्या हातात जातील. याच भीतीने सरकार जातगणना करीत नाही.

मुंबई : अाेबीसींची जातगणना करण्याकरीता सरकार का घाबरत अाहे? जर जातगणना झाली तर अाेबीसींना त्यांची खरी ताकद कळून येर्इल हेच त्या मागचे खरे कारण आहे. ओबीसींना त्यांची संख्या कळली तर सत्तेच्या चाव्या त्यांच्या हातात जातील. याच भीतीने सरकार जातगणना करीत नाही.

वास्तविक पाहता अाेबीसींची जात निहाय जनगणना 1931 साली झाली. त्यानंतर ती अाजवर झालेली नाही. त्यामुळे ही जनगणना झालीच पाहिजे. ती लवकरात लवकर सुरु व्हावी अशी अामची ठाम मागणी असून त्याशिवाय अाम्ही गप्प बसणार नाही असे प्रतिपादन माजी खासदार डाॅ. भालचंद्र मुणगेकर यांनी अाझाद मैदान येथे अाेबीसी संविधानिक न्याय यात्रेच्या समाराेप प्रसंगी केला.

अाेबीसी समाजाची जातगणना व्हावी तसेच समाजात त्यादृष्टीने जनजागृती व्हावी, भटके विमुक्त अल्पसंख्यांकांना सुरक्षा तसेच नागरी हक्क मिळावे, सर्व मागासवर्गीय अायाेगांची अंमलबजावणी झाली पाहिजे या मागण्यांकरीता राज्यभरात संविधान न्याय यात्रा 11 एप्रिल पासून काढण्यात अाली हाेती. या यात्रेचा सांगता समारंभ दादर चैत्यभूमी येथे शुक्रवारी करण्यात अाला. त्यानंतर अाझाद मैदान येथे संविधानिक न्याय यात्रा महापरिषद अायाेजित करण्यात अाली हाेती.

यावेळी अामदार हरिभाऊ राठाेड, उत्तर प्रदेशचे खासदार निषाद अादी मान्यवर उपस्थित हाेते. या देशात अाेबीसींची संख्या 52 टक्के, दलित 20 टक्के तर अादिवारसी 10 टक्के अाहे म्हणजे एकूण 82 टक्के असणारी जनता विविध राजकीय पक्षांना मतदान करतात अाणि निवडून अालेले दहा टक्के अभिजन (उच्च वर्णीय) त्यांच्यावर राज्य करतात हे चित्र कुठेतरी बदलायला पाहिजे.त्यासाठी देशातील सर्व अाेबीसी बांधवांनी एकत्र हाेऊन लढा देण्याची गरज अाहे असेही मुणगेकर यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना जामिन मिळाल्याबद्दल अानंद व्यक्त करताना डाॅ. मुणगेकर यांनी अाेबीसी समाजासाठी भुजबळ अाणि स्व. गाेपिनाथ मुंडे यांनी पक्षाची झालर बाजूला ठेवून अाेबींसींसाठी लढा उभारण्यात माेलाचे याेगदान दिले असून अाम्ही त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहीजे असेही मुणगेकर म्हणाले. सभेकरीता अल्पप्रमाणात म्हणजेच जवळपास 200 चाही आकडा उपस्थितांनी गाठला नव्हता. इतकी कमी लाेकं जमली तरी त्याची चिंता व्यक्त करू नका अापले विचार समाजापर्यंत पाेहचण्याची गरज अाहे. संख्या महत्त्वाची नसून विचार पाेहचणे जास्त महत्वाचे अाहे असेही ते म्हणाले.

अाेबीसी, भटक्या विमुक्त जाती यांची जनगणना झाली पाहीजे,क्रिमिलेअरची अट रद्द केली पाहिजे. अारक्षण देण्यापेक्षा अारक्षण संपवा असे सरकारचे धाेरण असून त्याला अामचा विराेध अाहे. अाेबींसींची जनागृती माेहिम अाम्ही हाती घेतली असून त्याचा व्यापक परिणाम देशभरात दिसून येत अाहे असे अामदार हरिभाऊ राठाेड यावेळी म्हणाले.

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या अनुपस्थितीमुळे कार्यक्रमाचा झालेला  बेरंगपना नजरेत भरत होता. त्यातच भारिप नेते प्रकाश आंबेडकर हेही गैर हजर होते.

व्यासपीठासमाेरील प्रेक्षकांच्या अाणि कार्यकर्त्यांच्यासाठी च्या खुर्च्या रिक्त असल्याने व्यासपीठावर असलेले चिंतेचे वातावरण दिसून येत होते. 
संविधानिक न्याय यात्रा ही जातीगत ओबीसी जनगणनासह विविध मागण्यांकरीता काढण्यात आली होती.आज या महापरिषदेची 11 मे 18 रोजी आझाद मैदान येथे सांगता झाली.

व्यासपीठावर आ.हरिभाऊ राठोड, माजी खा.भालचंद्र मुणगेकर,खा.निषाद
उपस्थित होते. परिषदेत खा.हुसेन दलवाई हे फारच उशिरा आले.

Web Title: without bhujbal there is no enthusiasm in obs summit