मुंबईकरांनो खबरदार! मास्क नसेल तर भरावा लागणार दंड; BMC ची कारवाई सोमवारपासून सुरू

मिलिंद तांबे | Sunday, 13 September 2020

मास्क घाला नाहीतर खिसा खाली करा.... मास्क शिवाय फिरलात तर 200 रुपये दंड,  पालिकेचा आज (सोमवार)पासून कारवाईचा बडगा ,  रुग्णसंख्या वाढल्याने कडक पावलं उचलण्याचा निर्णय  

मुंबई  - मास्क शिवाय फिरणा-या लोकांवर 200 रूपये दंड आकारण्याचा निर्णय़ मपालिकेने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी उद्या ( सोमवार) पासून कऱण्यात येणार आहे. पालिकेच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करून लोकं मास्क शिवाय फिरत असल्याने मुंबईतील कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वाढू लागलीय. त्यामुळे पालिकेने कठोर पावलं उचलण्याचा निर्णय़ घेतला आहे.
शनिवारी मुंबईत एका दिवसात 2,321 बाधित रूग्ण सापडले. गेल्या महिन्याभरात मुंबईत 40,037 रूग्णांची भर पडली असून 1,118 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. रूग्णांचा आकडा पुन्हा वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जातेय. साधारणाता गणेशोत्सवाच्या आधी मुंबईतील कोरोना संसर्ग ब-यापैकी नियंत्रणात आला होता. रूग्णांची संख्या सरासरी 700 पर्यंत मर्यादीत होती. ती आता पुन्हा एकदा 2 हजारच्या वर गेल्याचे दिसते. तर मुंबईत रूग्णवाढीला दर 0.80 इतका होता तो आता वाढून 1.21 इतका झाला आहे.

नवीन पत्रीपुलाच्या दुसऱ्या टप्यातील गर्डर टाकण्याच्या कामाला सुरुवात; वाहतुकीतील बदल जाणून घेण्यासाठी वाचा

ऑगस्टच्या शेवटच्या आटवड्यात गणोशोत्सव साजरा केला गेला. तर 31 ऑगस्ट पासून अनलॉक 4 ला सुरूवात झाल्याने अनेक गोष्टी शिथिल झाल्या. लोकं मोठ्या प्रमाणावर घरातून बाहेर पडली. रस्त्यांवर,बाजारात गर्दी होऊ लागली. दुकानांवर पुर्वी सारखीच झुंबड उडू लागली. अनेक लोकं तर मास्क शिवाय फिरू लागली. सामाजिक अंतर राखल्याचे कुठेही दिसत नाही. यामुळे गेल्या  15 ते 20 दिवसांपासून मुंबईतील बाधित रूग्णांचा आकडा पुन्हा एकदा वाढू लागल्याचे दिसते.
लोकांनी मास्क घालूनच बाहेर पडावे, आवश्यक सामाजिक अंतर ठेवावे याबाबत वेळोवेळी निर्देश देण्यात आले आहेत. यानंतर पालिकेने लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याचा प्रयत्न केल्याचे अतिर्कत आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. मात्र तरि देखील अनेक लोकं निर्देशांचं उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास आले आहे. अश्या लोकांमुळे मुंबईत पुन्हा एकदा रूग्णांचा आकडा वाढत असल्याचे दिसते. त्यामुळे मास्क न घालता बाहेर फिरणा-या लोकांवर दंडात्मक कारवाईचा निर्णय आम्ही घेतला असल्याचे काकाणी यांनी पुढे सांगितले. 

नियमांच उल्लघन करणा-या लोकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश विभाग कार्यलयांना देण्यात आले आहेत. त्यानुसार काही ठिकाणी आम्ही अधिकारी व कर्मचा-यांची पथकं तयार केली असल्याचे काकाणी पुढे म्हणाले. ज्या विभागात कोरोना रूग्णांची संख्या बाढत आहे किंवा ज्या विभागातून अधिक तक्रारी आल्या आहेत तिथून या दंडात्मक कारवाीला सुरूवात करणार असल्याचे ही काकाणी यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्था, आयडॉलच्या परीक्षेच्या तारखा जाहीर; 'असे' असणार परिक्षेचे स्वरूप

एप्रिल महिन्यापासून पालिकेने दंडात्मक कारवाई सुरू केली होती. त्यातून पालिकेने पाच महिन्यात 27 लाख रूपयांचा दंड ही खारला होता. मात्र याकारवाईस अनेक लाक प्रतिनिधींना विरोध केल्याने ही कारवाई काहीशी थंडावली होती. लॉकडाऊनमध्ये अश्या प्रकारे दंडात्मक कारवाई करणे योग्य नसल्याचे काही लोकप्रतिनिधींचे म्हणणे होते. यानंतर पालिकेने लोकांमध्ये जनजागृती करण्यास अधिक भर दिला होता.

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )