विनापरवाना 407 गॅस सिलिंडर जप्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

विनापरवाना गॅस सिलिंडरचा वापर मुंबईत मोठ्या प्रमाणात होत असल्याचे आढळल्यावर महापालिकेने अग्निसुरक्षेची उपाययोजना म्हणून धडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत महिनाभरात 407 गॅस सिलिंडर जप्त केले, अशी माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली.

मुंबई - विनापरवाना गॅस सिलिंडरचा वापर मुंबईत मोठ्या प्रमाणात होत असल्याचे आढळल्यावर महापालिकेने अग्निसुरक्षेची उपाययोजना म्हणून धडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत महिनाभरात 407 गॅस सिलिंडर जप्त केले, अशी माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली.

मुंबईत रस्त्यांवर अन्नपदार्थ शिजवण्यासाठी, तसेच हॉटेलांतही विनापरवाना गॅस सिलिंडरचा वापर होत असल्याचे महापालिकेच्या पथकाला आढळून आले. सिलिंडरचा स्फोट होऊन जीवितहानी आणि वित्तहानीच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. विनापरवाना सिलिंडरमुळे दुर्घटना होऊ नये, यासाठी महापालिकेने मोहीम उघडली आहे. महापालिका पथकाने अग्निशमन दलाच्या परवानगीविना अनधिकृत गॅस सिलिंडर वापरणारी हॉटेले आणि फेरीवाल्यांची तपासणी केली.

Web Title: Without Permit 407 Cylinder Seized Crime