फुकट्या रेल्वे प्रवाशांचा टीसींना ठेंगा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

मुंबई - पाचशे व हजारच्या नोटा चलनातून रद्द झाल्याचा चांगलाच फटका रेल्वेच्या तिकीट निरीक्षकांना अर्थात टीसींनाही बसला आहे. फुकटे प्रवासी मोठ्या ऐटीत टीसीच्या नाकावर टिच्चून प्रवास करत आहेत. विनातिकीट पकडल्यास बाद झालेल्या नोटा दाखवत टीसींची खिल्ली उडवली जात आहे. सुट्या पैशांचा आग्रह करून थकलेल्या टीसीसमोरही त्यांना सोडून देण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. 

रेल्वे तिकिटासाठी जुन्या नोटा स्वीकारण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली असली तरी टीसींना तो नियम लागू नाही. मोठ्या नोटा चलनातून रद्द झाल्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर 9 नोव्हेंबरपासून टीसींची वसुली निम्म्यावर आली आहे. लांब पल्ल्याच्या एक्‍स्प्रेस व उपनगरीय स्थानकांवरील टीसींचे कामकाज अडले आहे. विनातिकीट प्रवाशांना 260 रुपये दंड होतो. पण, "हुशार' प्रवासी पाचशेच्या नोटा बिनदिक्कत टीसीच्या हाती टेकवत आहेत. वादावादी वा कुणा ओळखीच्या रेल्वेच्या अधिकाऱ्याला फोन करण्याची कसरत तो सध्या दिसत नाही, अख्या बाजारात सुट्या पैशांची चणचण असताना फुकट्या प्रवाशांची चंगळ झाली आहे. पाचशे-हजारच्या नोटा दाखवल्यानंतर टीसी हतबल होतात. सुट्टे नाहीच, अशी नकारघंटा प्रवासी लावतो. शेवटी विनातिकीट प्रवाशाला हात जोडून सोडावे लागते, असे एका टीसीने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. 

दंडवसुली घटली 

पश्‍चिम रेल्वेच्या टीसींनी दंडापोटी जुलै 2016 मध्ये सात कोटींचा महसूल मिळवून दिला होता. विनातिकीट प्रवाशांची महिनाभरात एक लाख 78 हजार प्रकरणांची नोंद करण्यात आली होती. सध्या मात्र दंडाची आकडेवारी घसरली असून, टीसींच्या वसुलीवर परिणाम झाला आहे. 

Web Title: Without tickets rail passenger ditched TC