esakal | डोंगरी येथून सव्वा कोटींच्या एमडीसह महिलेला अटक; पावणे नऊ लाखांची रोखही जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

डोंगरी येथून सव्वा कोटींच्या एमडीसह महिलेला अटक; पावणे नऊ लाखांची रोखही जप्त

सव्वा किलो मेफेड्रॉनसह(एमडी) एका 25 वर्षीय महिलेला अटक करण्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाला(एएनसी) यश आले आहे.

डोंगरी येथून सव्वा कोटींच्या एमडीसह महिलेला अटक; पावणे नऊ लाखांची रोखही जप्त

sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई - सव्वा किलो मेफेड्रॉनसह(एमडी) एका 25 वर्षीय महिलेला अटक करण्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाला(एएनसी) यश आले आहे. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थाची किंमत सव्वा कोटी रुपये असून महिलेकडे पावणे नऊ लाखांचा रोखही सापडली आहे.

हेही वाचा - ED ने प्रताप सरनाईक यांना पुन्हा बजावला समन्स, चौकशीसाठी सोमवारी पुन्हा बोलावलं

सनम तारीक सय्यद(25) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. ती डोंगरी येथील शायदा मार्ग येथील रहिवासी आहे. तिच्याकडून एक किलो 105 ग्रॅम एमडी(किंमत एक कोटी 10 लाख रुपये), रोख रक्कम आठ लाख 78 हजरा रुपये असा एकूण एक कोटी 19 लाख 28 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती एएनसीने दिली. तिच्याविरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा कलम 8(क), 22(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई परिसरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

डोंगरी परिसरात एक महिला अंमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती एएनसीचे पोलिस हवालदार पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार डोंगरी येथील फेब हाऊस येथील इमारीतच्या तिस-या मजल्यावर या महिलेच्या घरी छापा टाकला असता तिच्याकडे एमडी सापडले. त्यानुसार पोलिसांनी सर्व मुद्देमाल ताब्यात घेऊन महिलेला अटक केली. महिलेच्या संपर्कात मुंबई शहर व उपनगरातील काही ग्राहक असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याबाबत पथक अधिक तपास करत आहे.

Woman arrested with Rs 1.5 crore banned chemical from Dongri

--------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top