कपडेचोरी करणारी महिला ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

गर्दीचा फायदा घेत महिलांच्या कपड्यांचे ४४ नग चोरी करून पळणाऱ्या दोन महिलांपैकी एकीला जागीच पकडून उल्हासनगर पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना घडली आहे.

उल्हासनगर : गर्दीचा फायदा घेत महिलांच्या कपड्यांचे ४४ नग चोरी करून पळणाऱ्या दोन महिलांपैकी एकीला जागीच पकडून उल्हासनगर पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना घडली आहे. शहरातील कॅम्प नं.२ येथील नेहरू चौक परिसरात अंजू वाघेला व तिची नणंद आरती वाघेला व भाऊ सोनू वाघेला यांनी महिलांच्या कपडे विक्रीचे दुकान लावले होते. रात्री पावणे आठच्या सुमारास दुकानात गिऱ्हाईकांची कपडे खरेदी करण्यासाठी गर्दी असताना दोन महिलांनी गर्दीचा फायदा घेत रचून ठेवलेल्या कपडयातील सुमारे १० हजार रुपये किमतीचे ४४ नग चोरी केले. हा प्रकार सोनू वाघेला याच्या लक्षात येताच त्याने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने कपडे चोरी करून पळणाऱ्या दोन महिलांपैकी शबाना मेमन या महिलेला जागीच पकडून तिला उल्हासनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman caught stealing clothes