नोकरीच्या प्रलोभनाने साडेपाच लाखाची महिलेची फसवणूक 

नोकरीच्या प्रलोभनाने साडेपाच लाखाची महिलेची फसवणूक 

नवी मुंबई -  परदेशात नोकरी लावून देण्याचे प्रलोभन दाखवून एका भामट्याने कुर्ला येथे राहणाऱ्या 64 वर्षीय सेवानिवृत्त महिलेकडून तब्बल 5 लाख 50 हजार रुपये उकळून त्यांच्या मुलाला बनावट नियुक्तिपत्र देऊन त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. काझी सादीक हुसेन असे या भामट्याने नाव असून खारघर पोलिसांनी त्याच्यावर फसवणुकीसह बनवेगिरी केल्याप्रकणी गुन्हा दाखल केला आहे. 

जरीना मुमताज मिर्जा बेग (64) या कुर्ला भागात राहण्यास असून 2015 मध्ये त्या आपल्या मुलासाठी नोकरीच्या शोधात होत्या. त्या वेळी त्यांच्या मोठ्या मुलाच्या ओळखीतल्या शाकीर हुसेन शेख या व्यक्तीने सादीक हुसेन हा मुलांना परदेशात नोकरीसाठी पाठवत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे जरीना बेग यांनी आपल्या मुलासह खारघर येथील कार्यालयात त्याची भेट घेतली होती. त्यावेळी सादीक हुसेन याने जरीना बेग यांच्या मुलाला सिंगापूर येथे शिपवर नोकरीसाठी पाठवून देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच त्याला महिना 90 हजार रुपये पगार मिळेल, असेही सांगितले होते. त्यावेळी सादीक हुसेन याने जरीना बेग यांना इतर मुलांना बाहेरगावी नोकरीसाठी पाठविल्याबाबतची कागदपत्रेसुद्धा दाखविली होती. 

त्यानंतर जरीना बेग यांनी सादिक हुसेन याने मागणी केल्यानुसार त्याला 4 लाख 50 हजार रुपये दिले होते. त्यानंतर सादिक हुसेन याने बनवाट नियुक्तिपत्र बनवून जरीना बेग यांच्या मुलाला दिले. दीड महिन्यानंतर सादिकने आणखी एक लाख रुपये उकळले. मात्र तरीही त्याने जरीना बेग यांच्या मुलाला नोकरीसाठी परदेशात पाठविले नाही. प्रत्येक वेळी त्याने वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com